अभिनेता आमिर खानचा दुसऱ्यांदा घटस्फोट?

किरण रावसोबत 15 वर्षांनी काडीमोड

Goan Varta Live | प्रतिनिधी

मुंबई : आमिर खान आणि किरण राव यांनी लग्नाच्या 15 वर्षानंतर घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केले आहे. शनिवारी जाहीर केलेल्या संयुक्त निवेदनात त्यांनी सांगितलं की ते त्यांचा मुलगा आझादसाठी सह-पालक म्हणून कायम राहतील. 15 वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर आम्ही घटस्फोट घेत असल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. आम्हाला आमच्या आयुष्यातील नव्या अध्यायाची सुरुवात करायची आहे. त्यामध्ये आम्ही पती-पत्नी नव्हे, तर पालक आणि एकमेकांसाठी कुटुंबातील एक सदस्य असू, असं या निवेदनात म्हटलं आहे. आमिर खान आणि किरण राव यांच्या घटस्फोटामागील नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

बॉलिवूड अभिनेता आमिर खानचे दुसरे लग्नही मोडलं आहे. आमिर खान आणि किरण राव हे दोघे परस्पर संमतीने घटस्फोट घेत आहेत. 28 डिसेंबर 2005 रोजी या दोघांचं लग्न झालं. या दोघांनीही पंधरा वर्षानंतर ते घटस्फोट घेत असल्याचं सांगून सर्वांना चकित केलं आहे. आमिर आणि किरण यांनीही घटस्फोटाबाबत अधिकृत निवेदन प्रसिद्ध केलं आहे.

ते पुढे म्हणाले की, आमच्या नातेसंबंधाबद्दल नेहमी समजून घेतल्याबद्दल आमच्या कुटुंबाचे आणि मित्रांचे आभार. हा घटस्फोट शेवट नसून एका नवीन प्रवासाच्या प्रारंभाच्या रुपात दिसेल.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!