नागराज मंजुळे यांचा आगामी चित्रपट वादाच्या भोवऱ्यात

Goan Varta Live | प्रतिनिधी
ब्युरो: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा ‘झुंड’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या चित्रपटाचं दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केलंय. मात्र हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकलाय.आधी तेलंगना उच्च न्यायालयाने या चित्रपटावर बंदी घातली होती. अणि आता त्यांच्या या बंदीला थेट सर्वोच्च न्यायालयानेच मान्यता दिलीये.
नंदी चिन्नी कुमार नामक एका व्यक्तीनं या चित्रपटावर कॉपी राईट्सचा दावा ठोकलेला. अर्थात हा दावा ‘झुंड’ च्या निर्मात्यांनी फेटाळून लावलाय. परंतु तेलंगना उच्च न्यायालयाने मात्र बिग बींच्या या चित्रपटावर बंदी घातली. पुढे या बंदी विरोधात निर्मात्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. जस्टिस बोबडे, केएस बोपन्ना आणि वी रामा सुब्रमण्यम यांच्या निरिक्षणाखाली हे प्रकरण कोर्टात सुरु होते. मात्र या तीन न्यायाधीशांच्या समीतीनं देखील ‘झुंड’ चित्रपटाला दिलासा दिला नाही. त्यांनी देखील तेलंगना उच्च न्यायालयाच्या बंदीस मान्यता दिली. परिणामी हा चित्रपट पाहण्यासाठी आता प्रेक्षकांना आणखी काही काळ वाट पाहावी लागणारे.

मराठी चित्रपट आणि एकूणच चित्रपटसृष्टीचे आकर्षण ठरलेले नागराज मंजुळे यांचा ‘झुंड’ हा पहिला हिंदी चित्रपट. या चित्रपटात अमिताभ बच्चन प्रमुख भूमिकेत दिसणारेत.अमिताभ बच्चन आणि नागराज मंजुळे हे दोन प्रतिभावंत कलाकार या चित्रपटाच्या निमित्तानं एकत्र आले असल्यानं ‘झुंड’ बद्दल लोकांच्या मनात उत्सुकताये. हा चित्रपट विजय बरसे यांच्या आयुष्यावर आधारित आहे. विजय यांनी झोपडपट्टीतील मुलांना प्रशिक्षण देत त्यांची फुटबॉल टीम बनवली. त्यांच्या याच कथेवर हा चित्रपट बेतला असल्याचं म्हटलं जातंय.