‘बधाई दो’ या चित्रपटात आयुषमानऐवजी ‘या’ अभिनेत्याची वर्णी…
अभिनेता आयुषमान खुराना ऐवजी अभिनेता राजकुमार राव

Goan Varta Live | प्रतिनिधी
बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुरानाचा २०१८मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बधाई हो’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केलेली. हटके कथा , आयुषमानचा अभिनय एकंदरीत या चित्रपटाने अनेकांची मने जिंकलेली. आता या चित्रपटाचा पुढचा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणाराय. पण या चित्रपटात अभिनेता आयुषमान खुराना ऐवजी अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री भूमि पेडणेकर मुख्य भूमिकेत दिसणाराय.या सीक्वेलचे नाव ‘बधाई दो’ असे ठेवण्यात आलंय. चित्रपटाचे चित्रीकरण पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात सुरु करण्यात येणाराय.
- राजकुमार रावने इंस्टा अकाऊंटवर फोटो शेअर केलाय.
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.