मराठी अभिनेते अविनाश खर्शीकर यांचं निधन

९० च्या दशकात अभिनयासोबतच खर्शीकर यांच्या फ्रेश लुकची चर्चा सिनेसृष्टीत होती.

Goan Varta Live | प्रतिनिधी

मुंबई : ज्येष्ठ मराठी अभिनेते अविनाश खर्शीकर (Avinash Kharshikar) यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. गुरुवारी सकाळी दहा वाजता ठाणे इथल्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

९० च्या दशकात अभिनयासोबतच खर्शीकर यांच्या फ्रेश लुकची चर्चा सिनेसृष्टीत होती. सदाबहार असे अविनाश खर्शीकर यांची पहिली दैनंदिन मालिका ‘दामिनीत’ त्यांनी महत्वाची भूमिका साकारली होती. मराठी सिनेसृष्टीतील देखण्या अभिनेत्यांपैकी अविनाश एक होते.

१९७८ मध्ये ‘बंदिवान मी या संसारी’ या चित्रपटाद्वारे अविनाश यांनी सिनेसृष्टीतील कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यांनी जसा बाप तशी पोरं, आधार, आई थोर तुझे उपकार, माझा नवरा तुझी बायको, चालू नवरा भोळी बायको, बकुळा नामदेव घोटाळे, घायाळ, लपवाछपवी, माफीचा साक्षीदार यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या.

तुझं आहे तुजपाशी, सौजन्याची ऐशी तैशी, वासूची सासू, अपराध मीच केला, दिवा जळू दे सारी रात, लफडा सदन ही त्यांची नाटकं तर प्रचंड गाजली होती. खर्शीकर यांनी चित्रपट, मालिका, रंगभूमी अशा तिन्ही माध्यमांमध्ये काम केलं होतं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!