आर्यन खानला ‘तारीख पे तारीख’

जमीनावर आजही निर्णय नाहीच!

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः आर्यन खानच्या जामीनावर आज मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती नितीन सांबरे यांच्यासमोर सुनावणी पार पडली. यामध्ये आर्यन खानला कोणताही दिला मिळालेला नाही. या प्रकरणात उद्या पुन्हा सुनावणी पार पडणार आहे. मुकुल रोहतगी आणि अमित देसाई यांच्यावतीने आर्यन आणि अरबाजची बाजू मांडण्यात आली. दोघांवर केलेली कारवाई अनधिकृत असल्याचं त्यांनी म्हटलं. तसेच सुनावणी दरम्यान दोन्ही बाजूच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. अखेर या प्रकरणाची सुनावणी उद्या पार पडणार असल्याची माहिती न्यायालयाने दिली.

३ ऑक्टोबरपासून अटकेत

कार्डेलिया क्रूज ड्रग्ज केस प्रकरणात आर्यन खान ३ ऑक्टोबरपासून अटकेत आहे. मंगळवारी झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयात एनसीबीने आर्यन खानचा जामीन फेटाळायलाच हवा अशी मागणी केली. साक्षीदारांना फोडण्याचे आणि पुराव्यांशी छेडछाडीचा प्रयत्न केला जात असल्याचं एनसीबीने यावेळी न्यायालयात सांगितलं. मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरु आहे.

काय म्हणाले आर्यनचे वकील ?

माझ्या क्लायंटकडून(आर्यन खान) कोणतीही गोष्ट हस्तगत करण्यात आलेला नाही. आणि त्याने कोणत्याही अंमली पदार्थाचे सेवन केले नव्हते. 3 ऑक्टोबरला त्याचे स्टेटमेंटही नोंदवण्यात आले आहे. आम्ही अनेक याचिकांमध्ये प्रश्न उपस्थित केला आहे की हे अधिकारी पोलीस अधिकारी नसले तरी ते पोलिसांचे अधिकार वापरतात. त्यामुळे त्यांना अटक करण्याचा अधिकार असल्याचे ते सांगतात. मात्र, आर्यनकडून कोणताही अमली पदार्थ मिळालेला नाही. त्याने कशाचंही सेवन केलं नव्हतं. त्याची वैद्यकीय चाचणी देखील करण्यात आली नाही. रोहतगी यांनी पंचनामा वाचून दाखवताना आर्यनचा मोबाईल जप्त केल्याची कोणतीही माहिती पंचनाम्यात नसल्याचं सांगितलं.

अरबाजकडे ड्रग्ज मिळाले. मात्र, आर्यनच्या ताब्यात कोणत्याही प्रकारचे ड्रग्ज नव्हते. सोबत असणाऱ्या अन्य व्यक्तीकडे ड्रग्ज होते. मात्र, याचा अर्थ त्याबद्दल मला माहिती आहे, किंवा मी ते सेवन करणार आहे, असं होत नाही. त्यामुळे अनधिकृतपणे ही अटक करण्यात आली आहे, असे एड. रोहतगी म्हणाले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!