बायबलची आता ऍनिमेशन सीरिज

फॅट हॅमस्टर स्टुडिओकडे सोपवली जबाबदारी

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: नॉर्वेच्या कंपनीसाठी गोव्याची कंपनी फॅट हॅमस्टर स्टुडिओ बायबल ऍनिमेशन सीरिज तयार करतायेत. नॉर्वेजियन कंपनीने येत्या वर्षभरात आणखी तीन सीझन ३-डी तंत्रज्ञानमध्ये कार्यान्वित करण्यासाठी फॅट हॅमस्टर ऑनिमेशन स्टुडिओची नेमणूक केलीये.

‘जीसस इज माय फ्रेंड’ या शीर्षकाच्या मालिकेमध्ये बायबल मधील विविध कथा मजेशीर आणि संवादात्मक पद्धतीने सांगितल्या जाणार आहेत. तसेच तरुण प्रेक्षकांना प्राचीन गोष्टीचे महत्त्व पटवून देण्यात येणारे. सध्या ही मालिका २-डी तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलीये. तिसऱ्या सीझनमध्ये ही मालिका १४ भाषांमध्ये अनुवादित करण्यात येईल.

गोवा स्थित फॅट हॅमस्टर स्टुडिओ, अॅनिमेशन, ऑगमेंटेड रिअॅलिटी आणि व्हर्च्युअल रिअॅलिटी फर्म ब्रुन्स्टॅडटीव्ही या नॉर्वेजियन कंपनीसाठी बायबलमधील कथांवर आधारित अॅनिमेशन मालिका तयार करत आहे. म्हापसाचे वेस्ले कॅरॅस्को आणि झांबियाहून परतलेले रोहन पन्निआ, अॅनिमेशनची आवड असणारे दोघे एकत्र आले आणि फॅट हॅमस्टर स्टुडिओची स्थापना केली. ते आता भारत, आफ्रिका, युरोप, मध्य पूर्व आणि अमेरिकेत उपस्थिती असलेले अॅनिमेशन पॉवरहाऊस आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!