मिसेस फडणवीस पुन्हा चर्चेत! ‘तिला जगू द्या’वर लाईक्सपेक्षा डिसलाईक्स जास्त

भाऊबीजेच्या निमित्तानं अपलोड केलं नवं गाणं

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

ब्युरो : बातमी आहे अमृता फडणवीस यांची… असे फार कमी मुख्यमंत्री होऊन गेले.. ज्यांच्या पत्नी मुख्यमंत्री नसतानाही चर्चेत राहिल्या… त्यापैकीच एक आहेत.. अमृता फडणवीस.. कधी आपल्या ट्वीटमुळे… तर कधी धारदार प्रतिक्रियेमुळे त्या चर्चेत असतात. त्यांची एक खासियत म्हणजे त्या गातातही. त्यांचं एक नवं गाणं चर्चेत आलंय. या गाण्याला मोठ्या संख्येनं पाहिलं जातंय. संमिश्र प्रतिक्रियाही या गाण्याच्या निमित्ता उमटल्यात. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी गायलेल्या गीताचे बोल आहेत.. तिला जगू द्या..

१ मिलियनपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिलाय. टी-सीरीज मराठीच्या यू-ट्यूब चॅनलवर हा व्हिडीओ अपलोड करण्यात आलाय. भाऊबीजेच्या निमित्तानं हा व्हिडीओ तयार करण्यात आलं होतं. चाहत्यांच्या प्रेमानं भारावून गेलेल्या अमृता फडणवीस यांचा आत्मविश्वास दुणावलाय. मी पुन्हा येईन, हे जसं देवेंद्र फडणवीसांनी म्हटल होतं.. तसंच मी पुन्हा आणखी एक नवं गाणं घेऊन येईन, असं ट्वीट करत अमृता फडणवीसांना चाहत्यांचे आभार मानलेत.

डिसलाईक्स जास्त

महत्त्वाचं म्हणजे अमृता फडणवीस यांच्या गाण्याला तुफान हिट्स तर मिळाले. आतापर्यंत दीड हजार लोकांनी हे गाणं लाईक केलंय. तर डिसलाईक करणाऱ्यांच्या संख्याही मोठी आहे. तब्बल १५ हजार लोकांनी हे गाणं डिसलाईक केलंय. या व्हिडीओवर आलेल्या कंमेटही संमिश्र आहे. काहींनी अमृता फडणवीसांच्या गाण्यावर सडकून टीका केली आहे. तर काहींना त्यांच्या धासडाचं कौतुक वाटतंय.

सडकून टीका

अभिनेते आणि निर्माते महेश टिळेकर यांनी अमृता फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. फेसबूक पोस्ट लिहून त्यांनी अमृता फडणवीसांच्या गायकीवर सवाल उपस्थित केलेत. गायी म्हशीच्या हंबरडण्याचा आवाज एकवेळ लोक सहन करतील पण या गायिकेचा आवाज ऐकून तिच्या आवाजाला अनेकांनी शब्दरुपी श्रद्धांजली वाहिली तरीही ही स्वयंघोषित गायिका मी पुन्हा गाईन मी पुन्हा गाईन म्हणत आपल्या गळ्याचा व्यायाम थांबवायचे नाव घेत नाही… अशा शब्दांत निशाणा साधलाय. सोशल मीडियावर अनेकांची मीम्सही बनवून अमृता फडणवीसांच्या गाण्यावर टीका केली आहे.

ट्रोलिंगच्या पलिकडे

याआधीही अनेकदा अमृता फडणवीस यांना त्यांच्या गाण्यावरुन ट्रोल करण्यात आलं होतं. मात्र ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करुन त्यांनी आपली गायकी सुरु ठेवली आहे. त्यांच्या या धाडसाचं कौतुक करणाराही एक वर्ग आहे. अमिताभ बच्चन यांच्यासोबतही अमृता फडणवीस यांनी एक गाणं केलं होतं. स्टेज शो सुद्धा अमृता फडणवीसांनी केले होते. या सगळ्यानंतर अमृता फडणवीस पुन्हा चर्चेत आल्या आहेत. यानिमित्तानं लोकं पुन्हा एकदा अमृता फडणवीसांचे जुने फोटो शेअर करुन त्यांच्याबाबत चर्चा रंगवताना दिसत आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!