चाहत्यांकडून सतत होणाऱ्या ट्रोलिंगनंतर बिगबींनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

पान मसाला कंपनीसोबतचा करार संपवला; एका ब्लॉगमध्ये दिली माहिती

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांचे नेहमी मनोरंजन करतात. आज अमिताभ यांचा 79 वा वाढदिवस आहे. बिग बींच्या चाहत्यांनी त्यांना सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या आहेत. नुकताच अमिताभ यांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यांन ‘कमला पसंद’ या कंपनीच्या जाहिरातींसोबतचा करार संपवला आहे. ‘कमला पसंद’ या  पान मसाला कंपनीच्या जाहिरातींमध्ये काम केल्याने अमिताभ यांना सोशल मीडियावर अनेक नेटकरी ट्रोल करत होते. आता कमला पसंतसोबत अमिताभ यांनी  करार संपवला असून त्याबद्दल एका ब्लॉगमध्ये माहिती देण्यात आली आहे. 

ब्लॉगमध्ये लिहीले आहे, ‘कमला पसंद… जाहिरात प्रसारित झाल्यानंतर काही दिवसांनी अमिताभ बच्चन यांनी ब्रँडशी संपर्क साधला आणि गेल्या आठवड्यात त्यातून बाहेर पडले. त्यांना माहित नव्हते की ही जाहिरात सरोगेट जाहिरातीत येते. अमिताभ यांनी ब्रँडसोबतचा करार संपवला आहे. तसेच प्रमोशनसाठी मिळालेले पैसे देखील त्यांनी परत केले आहे.’

कमला पसंती जाहिरातीमुळे लोक करत होते बिगबींना ट्रोल

काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांना कमला पसंद या जाहिरातीवरून एका नेटकऱ्याने कमेंट करून ट्रोल केले. त्या यूजरने कमेंट केली, ‘नमस्कार सर, एक गोष्ट तुम्हाला विचारायची होती. कमला पसंत पान मसाला जाहिरातीमध्ये काम करण्याची काय गरज होती?’ या कमेंटवर अमिताभ यांनी उत्तर दिले, ‘नमस्कार, कोणत्याही व्यवसायामध्ये जर कोणाचे चांगले होत असेल, तर असा विचार करू नये की आपण त्यामध्ये का काम करावे. व्यवसायात फक्त कामाचा विचार केला जातो. तुम्हाला वाटते की मी हे काम केले नाही पाहिजे पण  हे  काम करून  मला तर पैसे मिळतातच पण आमच्या कामामध्ये जे कर्मचारी आहेत किंवा इतर लोक आहेत त्यांना देखील काम आणि पैसे मिळतात.’

पान मसाला जाहिरातीतून माघार घ्या, बिंग बींना साळकरांचं पत्र

राष्ट्रीय तंबाखू निर्मूलन संघटना (नोट)चे अध्यक्ष डॉ. शेखर साळकर यांनी अमिताभ बच्चन यांना पान मसाला जाहिरातीतून माघार घेण्याचं आवाहन करण्याबाबचचं विनंती पत्र लिहिलं होतं. तसंच तंबाखूविरोधी मोहिमेला पाठिंबा देण्याची मागणी त्यांनी या पत्राद्वारे बिग बी यांना केली होती. तुम्ही तंबाखूविरोधी मोहिमेला पाठिंबा दिल्यास तरुण पिढीमधील व्यसनाधिनतेला आळा बसेल. तसंच यातून असंख्य युवकांचं मूल्यवान आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचू शकेल, असं डॉ. साळकर यांनी पत्रातून म्हटलं होतं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!