‘कुछ कुछ होता है’मधील क्यूट सरदार परजान दस्तूर लवकरच अडकणार लग्न बंधनात

सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली माहिती

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान, काजोल आणि राणी मुखर्जी यांच्या मुख्य भूमिका असणारा ‘कुछ कुछ होता है’ हा चित्रपट अजूनही लोकप्रियये. या चित्रपटात एका बाल कलाकाराची भूमिका परजान दस्तूरने साकारलेली. त्याने एका डायलॉगने प्रेक्षकांच्या मनावर जादू केलेली. ‘तुसी जा रहे हो, तुसी ना जाओ’ त्याचा हा डायलॉग आजही प्रेक्षकांच्या लक्षातये. आता परजान मोठा झाला असून फेब्रुवारी २०२१ मध्ये लग्न बंधनात अडकणारये.

परजानने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर गर्लफ्रेंड डेलना श्रॉफसोबतचा फोटो शेअर करत फेब्रुवारी २०२१मध्ये लग्न बंधनात अडकणार असल्याचे म्हटलेय.इन्स्टाग्राम अकाऊंटवर गर्लफ्रेंडला समुद्र किनारी प्रपोज करतानाचा फोटो शेअर केला असून. ‘तू एक वर्षापूर्वी हो म्हणाली होतीस. आता ४ महिन्यांनंतर लग्न’ या आशयाचे कॅप्शन दिलेय.

परजान दस्तूरने ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटाव्यतिरिक्त ‘हम तुम’ चित्रपटाला आवाज दिलेला. २००९ मध्ये त्याने पीयूष झा यांचा चित्रपट ‘सिकंदर’मध्ये मुख्य भूमिका साकारलेली. आता परजानचे स्वत:चे प्रोडक्शन हाऊस चालवतोय. एका मुलाखतीमध्ये परजानने शाहरुख खान सोबत पुन्हा काम करण्याची इच्छा व्यक्त केलीये.

हेही वाचा

हडफडेत आयपीएलवर कोट्यवधींची सट्टेबाजी

https://www.goanvartalive.com/goa/crime-branch-raids-ipl-betting-racket-in-arpora/

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!