‘द कपिल शर्मा शो’मध्ये दारू पिऊन अभिनेत्यने केलं असं काम; FIR दाखल करण्याची मागणी

तक्रारदार शिवपुरीच्या वकिलांकडून सीजेएम कोर्टात एफआयआर दाखल; पुढील सुनावणी 1 ऑक्टोबर रोजी

Goan Varta Live | प्रतिनिधी

मुंबई: शिवपुरीच्या जिल्हा न्यायालयात सोनी टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या ‘द कपिल शर्मा शो’च्या एका भागाविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. शोच्या एका एपिसोडमध्ये काही कलाकार दारू पित अभिनय करत असल्याचं समोर आल आहे. प्रत्येक बाटलीवर ‘दारू पिणे आरोग्यासाठी हानिकारक आहे.’ असं लिहिलेलं असताना देखील काही कलाकांनी सेटवर मद्यपान केल्यामुळे त्यांच्यावर एफआरआय दाखल करण्याची मागणी केली आहे. 

पुढील सुनावणी 1 ऑक्टोबर रोजी

तक्रारदार शिवपुरीच्या वकिलांनी सीजेएम कोर्टात एफआयआर दाखल केली आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 1 ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्यामुळे याप्रकरणी काय निकाल लोगतो आणि ‘द कपिल शर्मा’  शोवर काय संकट येईल हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. सांगायचं झालं तर वकिलांच्या तक्रारीनंतर ‘द कपिल शर्मा शो वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. 

‘कपिल शर्मा’ शो खूपच ढिसाळ

वकिलांच्या म्हणण्यानुसार, ‘सोनी टीव्हीवर प्रसारित होणारा ‘कपिल शर्मा’ शो खूपच ढिसाळ आहे. शोमध्ये मुलींवर देखील अश्लील कमेन्ट करण्यात येतात. एक वेळा शोमध्ये बेकायदा कोर्ट तयार करण्यात आलं आणि त्याठिकाणी काही कलाकारांनी दारू पिवून अभिनय केला. हा कायदा आणि न्यायालयाचा अवमान आहे.’

काय आहे प्रकरण?

अर्जामध्ये 19 जानेवारी 2020 च्या एपिसोडचा उल्लेख करण्यात आला आहे, ज्याचे रिपीट टेलीकास्ट 24 एप्रिल 2021 रोजी देखील केले गेले. वकिलांचा दावा आहे की, शोमध्ये एका पात्राला न्यायालयाचा सेट बनवून दारूच्या प्रभावाखाली वागताना दाखवण्यात आले. यामुळे न्यायालयाची बदनामी झाली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!