साहित्य वार्ता | ‘या’ लेखकांचा साहित्य सेवा गाैरव पुरस्काराने सन्मान

इस्न्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझाच्या काॅन्फरन्स सभागृहामध्ये सायंकाळी 4.00 वाजता संपन्न हाेणार्या कार्यक्रमात हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येईल.

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्यूरो रीपोर्ट : साहित्य क्षेत्रात सातत्यपूर्वक भरीव याेगदान देणाऱ्या साहित्यिकाला यंदापासून साहिल प्रकाशनतर्फे कै. आशिष नामदेव बुगडे स्मरणार्थ ‘साहित्य सेवा गाैरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. राेख रक्कम 10,001/-, स्मृतिचिन्ह व मानपत्र असे या पुरस्कारचे स्वरुप आहे. यंदाच्या या पहिल्या पुरस्कारासाठी राज्य पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक श्री. अवधूत यशवंत कुडतरकर यांची निवड करण्यात आली आहे. 11 ऑगस्ट 2023 राेजी पणजी येथील इस्न्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझाच्या काॅन्फरन्स सभागृहामध्ये सायंकाळी 4.00 वाजता संपन्न हाेणार्या कार्यक्रमात हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येईल.


1 सप्टेंबर 1949 जन्मलेल्या श्री. कुडतरकर यांनी गाेमंतक मराठी अकादमी या शैक्षणिक व साहित्यिक संस्थेत सेवा बजावली असून तेथेच ते निवृत्त झाले. त्यानंतर गेली जवळपास 12 वर्षे यशवंत त्रैमासिकाचे संपादक तथा प्रकाशक म्हणून यांनी साहित्य क्षेत्रात भरीव याेगदान दिले आहे. तसेच अनेक वर्तमानपत्रे, नियतकालिकांमधून त्यांनी चारहून अधिक दशके लेखन केलेे आहे.
रंभागर्भ(कवितासंग्रह), हिमनग(कवितासंग्रह), सांजवेळ(डायरी), दिगंबरा(कादंबरी), सुर्याश्व(कवितासंग्रह) अशी अनेक पुरस्कारप्राप्त मराठी पुस्तके त्यांच्या सिध्दहस्त लेखणीतून साकारली आहेत. शक्तिपात ही काेंकणी नवलिकाही त्यांच्या नावावर असून त्या नवलिकेलाही अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

साहित्य क्षेत्रातील याेगदानबद्दल गाेवा सरकारच्या कला व संस्कृती संचालनालयाने 2008-09 साली मानाचा राज्य सांस्कृतिक पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले आहे. त्याव्यतिरिक्त 1978-79 साली ‘रंभागर्भ’ या कवितासंग्रहासाठी त्यांना कला अकादमी गाेवा व गाेवा मराठी भाषा परिषदचे उत्कृष्ट साहित्य पुरस्कार प्राप्त झाले आहेत.


1988-89 साली ‘हिमनग’ या कवितासंग्रहासाठी कला अकादमी गाेवाचा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार त्याना लाभला आहे. 1988-89 साली ‘दिगंबरा’ या हस्तलिखितासाठी गाेमंतक मराठी अकादमीच्या उत्कृष्ट कादंबरी लेखन पुरस्काराचे ते मानकरी ठरले आहेत. 1998 साली द गाेवा हिंदु असाेसिएशन, मुंबईने प्रतिष्ठेचा कविवर्य बा. भ. बाेरकर पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले आहे.
2000-01 साली ‘शक्तिपात’ या नवलिकेसाठी कला अकादमी गाेवा, काेकणी भाषा मंडळ, जनगंगा कुडचडे काेकणी केंद्र, डाॅ. टी. एम. ए. पै फाऊंडेशन, मणिपाल या संस्थांनी त्यांना उत्कृष्ट साहित्य पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!