ललितसुधा | तो पाऊस…परतीचा अन् प्रितीचाही…

ऋषभ | प्रतिनिधी


HHHHHHHH

एके दिवशी अलगदपणे मनातल्या एका सुप्त कोपऱ्यात असलेल्या त्या काळोख्या अंधाऱ्या खोलीचे कुलूप नकळत उगडले गेले . त्या खोलीतल्या जमिनीवर विखुरलेल्या असतात काही आठवणींच्या बखरी अन् भिंतीवरच्या आरशावर साचलेली धूळ व त्या धुमिळ आरशासमोर मठ्ठ पणे उभा राहिलेला मी! मनाच्या अशाच कुठल्याशा कोपऱ्यातून एका आर्त स्वरात एक मंद गजल एकु आली


“होशवालों को खबर क्या,बेखुदी क्या चीज है…(x२)
इश्क किजे फिर समझिये( x२)
जिंदगी क्या चीज है……”

DFGe


मग मी त्या आरशाचा नाद सोडून त्याच जुन्या ८x१० च्या जुन्या तसबिरी, ज्या तिच्या हस्ते त्या भिंतींवर टांगल्या गेल्या, कायमच्याच ! बघत राहतो….


“ उनसे नजरे क्या मिली रोशन फिजाये हो गयी,
ऑर वो समझे नाही ये,
खामोशी क्या चीज है……(x२)”


मग एक भले मोठे गाठोडे दिसले…
मग एक एक गाठ जी नियतीने साळसूदपणे बांधली ती मी उगाच सोडवण्याचा प्रयत्न केली . का? विनाकारण ठरवून मृगजळ शोधून त्याच्या चकव्यात परत परत फिरत राहणे ही सवयच आहे मला! पुरातत्व विभागाच्या एका खंद्या शास्त्रज्ञाचा आव आणून त्याच आठवणींवर हलकेच ब्रश फिरवला .ब्रश जेवढे खोलात साफ करीत गेलो तेवढ्याच ठळकपणे तिची आकृती सामोरे आला.

“ ये बता दे मुझे जिंदगी(x२)
प्यार के राह के हमसफर,
किस तरह बन गये अजनबी….!
ये बता दे मुझे जिंदगी….(२x)
फुल सारे क्यूँ मुरझा गये…..!

जगजीत जी आणि चित्रा जी अजूनही त्या खोलीतून महफिल सजवतायत….

DFGD

आठवण अन् एकटेपण यांचे काय नाते आहे हे आजतागायत नाही हो पूर्णपणे समजू शकलो! ती तेव्हाच येते जेव्हा “ती” नसते, काय म्हणावे तिला समजत नाही….सावली? म्हणले तर सावलीच ती पण तिच्या सारखा अंधार सावलीचा नसतोच मुळी! तिची आठवण म्हणजे स्वतःच्याच अस्तित्वाला दिलेले आव्हान आहे हे मात्र नक्की….!

मग जरा भानावर आलो. “चला आज सुट्टी आहे जरा साफ सफाई करून घेऊया…!”स्वतःशीच पुटपुटले.

“म्हणजे कितीदा नवे मार्ग शोधावे माणसाने स्वतःला उध्वस्त करण्याचे!
अवघड आहे बुवा”….नुकतेच धुतलेले कपडे वॉशिंग मशीन मधून काढता काढता मी स्वतःशीच म्हणले ….

तोच संदीप खरे अन् सलील कुलकर्णी ही द्वयी एव्हाना खोलीतून गात होती
“ नसतेस घरी तू जेव्हा….
जीव तुटका तुटका होतो…..
जगण्याचे विरती धागे संसार फाटका होतो….
नभ फाटून वीज पडावी…
कल्लोळ तसा ओढवतो…..
ही धरा दिशाहीन होते…
अन् चंद्रकोर काहूरते…..”

FG


मी परत आपला बादली घेवून कपडे घेऊन गच्ची वर वाळत घालून आलो …..
आता जरा लिंबू सरबत पिऊ म्हणले …ही गरमी काही सोसवत नव्हती बुवा….

“रींगग्गग्गग्गग्गग्गग्गग्गगग्ग…….”
रींगग्गग्गग्गग….
….
रींगग्गग्गग्गग्गग्गग्गग्ग…..
रींगग्गग्गग……”

कोण असेल ह्या वेळी आता….
मी कटकट करीत दार उघडले…..

“किती वेळ आरे दार उघडायला….?
काय दिवस होता यार आजचा…. सकाळी बस उशिरा आली…कामावर लेट पोहोचली…त्यात क्लाएंट ने मीटिंग कॅन्सल केली….काल पुर्ण रात भर जागून किती मेहनतीने तयारी केलेली प्रेझेंटेशन ची…. कोणाला काही कीमतच नाही…येताना बाजारातून आवळे आणि चिंचा घेवून आलीय अन् हो लिंबू खूप महागलेत म्हणून पाव किलोच घेऊन आले…..किती गर्दी होती रे बाजारात…गर्मी सुद्धा…..वाफा निघत होत्या डोक्यातून…..!
मग अचानक सुसाट्याचा वारा सुरू झाला काय नि पाऊस पडला काय! सगळेच विपरीत होतय.
अरे चिंब भिजले ना मी…..हे घे ठेव आवळे आणि चिंचा…..आजकाल कधीपण पाऊस पडतो अरे…ऑक्टोबर-नोव्हेंबर काय पाऊस पडण्याची वेळ?…..पाऊस पण ना तुझ्या सारखा अनप्रेडीक्टेबल आहे…
अरे..असा का तोंड आ वासून उभा आहेस देव…..अरे टॉवेल आणून दे लवकर….ते लिंबू सरबत आहे का हातात तुझ्या? दे ते इकडे…टॉवेल आण जा…!…….”

HFJ

मी तरीही तेथेच उभा
…..”ए अरे देव….टॉवेल दे रे सायबा….! आणि A C लाव ….” लिंबू सरबताचा ग्लास पूर्ण रिचवत माया बोलली…..!

मी स्वतः शीच हसत हसत आत जाऊन एक स्वच्छ टॉवेल घेवून आलो…
“काय बघतोय असा…अन् आज घर साफ वगेरे केलेस? काय प्लॅन आहे….?

मागून जगजीत जी आणि चित्रा जी सुर घेतायत..

“तुमको देखा तो यह खयाल आया…..
जिंदगी धूप…तुम घना साया……!”

……तर गजल एकत होतास….?
“ हो….खूप आठवण आली तुझी…”
“…..का रे…?
“सकाळी उठलो तर बेडच्या दुसऱ्या बाजूस तू नव्हतीस….मग…मी….!” ओशाळल्यागत तोंडातल्या तोंडातून काही तरी बोललो…!
“अरे अरे अरे….. काय करू मी तुझं..कसा आहेस रे तू!..” ती माझेच केस विस्कटून म्हणाली…”
अन् मी तिचे केस टॉवेलने अन् ब्लोअर ने वाळवण्यात व्यस्त झालो……!

“देव….ती बादली हॉल मध्ये काय करतेय ?” तीने केसांना टॉवेल गुंडाळत विचारले.

मी तिकडेच घुम्या सारखा उभा राहिलो….
काय सांगणार गच्चीवर कपडे घातलेले ते विसरलो म्हणून…?

Rain Window Room

“…..अरे यार…………”

तिने हातास धरून मला वर गच्चीवर नेले…
“कसा विसरलास रे?…”
“कामात बिझी होतो ना मी, विसरलो असेन…..”
“हे बरे आहे आपले ….”

पाऊस कोसळत होता…आसमंत भारून आला होता…

“आजपर्यंत खूप पावसाळे सोबत पाहिले ना आम्ही….
पण असा पाऊस नाही ना रे पहिला…..”

“नाही……! तीला भर पावसात मिठीत घेत मी म्हणले…

WSEDFH

“ भलताच रोमेंटिक झालायस आज….!”

“परतीच्या पावसाची जादू असेल बहुतेक……” मी तिला मिठीत घेत म्हणले…

“अह… प्रितीच्या पावसाची आतुरता

तिने माझ्या कपाळावर ओठ टेकवत म्हंटले….

अन् काय ?

राहिलो जरा वेळ भिजत तेथेच.

आतून लकी अली गात होता…..

“शाम सव्हेरे तेरी यांदे आती है,
आ कर दिलं कों मेरे यु तडपाती है,
ओ सनम, मुहॉबात की कसम…….!”

sfFDFGS
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!