मैं अटल हूं: अटलबिहारी वाजपेयींच्या भूमिकेत दिसणार पंकज त्रिपाठी, फर्स्ट लूक रिलीज
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची ९८वी जयंती २६ डिसेंबर २०२२ रोजी पूर्ण भारतात साजरी झाली . यावेळी अभिनेता पंकज त्रिपाठी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून माहिती दिली की, ते लवकरच त्यांच्या बायोपिकमध्ये अटल बिहारीची भूमिका साकारताना दिसणार आहे, पहा त्यांचा फर्स्ट लूक !

ऋषभ | प्रतिनिधी
मैं अटल हूं: माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची ९८वी जयंती २६ डिसेंबर २०२२ रोजी साजरी केली गेली. यानिमित्ताने देशभरातील त्याचे चाहते त्यांना मिस करत आहेत. यावेळी अभिनेता पंकज त्रिपाठी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून माहिती दिली की, ते लवकरच त्यांच्या बायोपिकमध्ये अटल बिहारीची भूमिका साकारताना दिसणार आहे. तसेच, त्यांनी सांगितले की, अटलबिहारी वाजपेयींचे पात्र त्यांच्या आयुष्यातील सर्वात आव्हानात्मक व्यक्तिरेखा आहे.
अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म 25 डिसेंबर 1924 रोजी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे झाला होता. पंकज त्रिपाठी लवकरच त्याच्या बायोपिक ‘मैं अटल हूं’मध्ये दिसणार आहे. पंकज त्रिपाठीने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ‘मैं अटल हूं’ चित्रपटाशी संबंधित त्याचा लूक शेअर केला आहे. या लूकमध्ये पंकज त्रिपाठी हुबेहूब अटलबिहारी वाजपेयींसारखे दिसत आहेत.

ही पोस्ट शेअर करत पंकज त्रिपाठी यांनी पंडित धीरेंद्र त्रिपाठी यांच्या कवितेच्या ओळी लिहिल्या आहेत- . यासोबत त्याने लिहिले “न कभी कहीं डगमगाया, न कभी कहीं सर झुकाया, मैं एक अनोखा बल हूं, मैं अटल हूं..”
– हे अनोखे व्यक्तिमत्व पडद्यावर व्यक्त करण्याची संधी मिळाली. मी भावनिक आहे मी आभारी आहे. #MainAtalHoon थिएटरमध्ये, डिसेंबर 2023.