कांतारा फेम ऋषभ शेट्टीचा डंका; दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील मोस्ट प्रॉमिसिंग अॅक्टरचा पुरस्कार जाहीर
ऋषभ शेट्टीला (Rishab Shetty) दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील (Dadasaheb Phalke International Film Festival) मोस्ट प्रॉमिसिंग अॅक्टर हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

ऋषभ | प्रतिनिधी

Rishab Shetty: अभिनेता ऋषभ शेट्टीनं (Rishab Shetty) त्याच्या कांतारा (Kantara) या चित्रपटामधील अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली. या चित्रपटाचं दिग्दर्शन देखील ऋषभनं केलं. या चित्रपटाच्या कथानकाला आणि चित्रपटामधील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. आता ऋषभ शेट्टीला दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील (Dadasaheb Phalke International Film Festival) मोस्ट प्रॉमिसिंग अॅक्टर हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे CEO अभिषेक मिश्रा यांनी एका पत्राद्वारके ही माहिती दिली आहे.

दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा पुरस्कार सोहळा हा 20 फेब्रुवारीला पार पडणार आहे. हा पुरस्कार सोहळा मुंबईमधील ताज लँड एंड हॉटेलमध्ये पार पडणार आहे. या सोहळ्यात ऋषभला मोस्ट प्रॉमिसिंग अॅक्टर या पुरस्कारानं सन्मानित केलं जाणार आहे. दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये अनेक कलाकारांना सन्मानित केलं जातं. 2019 मध्ये दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात केजीएफ फेम अभिनेता यशला सन्मानित करण्यात आलं. तर 2020 मध्ये अभिनेता किच्चा सुदिपला दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील मोस्ट प्रॉमिसिंग अॅक्टरचा पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
हेही वाचाः कळसा प्रकल्पात वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन नाही
ऋषभ शेट्टीनं घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट
काही दिवसांपूर्वी ऋषभ शेट्टीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. नरेंद्र मोदी यांच्यासोबतचे काही फोटो त्यानं सोशल मीडियावर शेअर केले होते. हे फोटो शेअर करुन त्यानं लिहिलं, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतची भेट प्रेरणादायी ठरली. भारताला नवी दिशा देण्यासाठी मनोरंजन उद्योगाचे योगदान आणि प्रगतीशील कर्नाटक या विषयांवर चर्चा केली. #BuildingABetterIndia मध्ये योगदान दिल्याचा अभिमान आहे. तुमचे दूरदर्शी नेतृत्व आम्हाला प्रेरणा देते.’

कांताराला ठरला हिट
कांतारा या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली. या चित्रपटामध्ये ऋषभबरोबरच अच्युता कुमार, सप्तमी गौडा, प्रमोद शेट्टी यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली.
