एंटरटेंमेंट वार्ता : T-Series च्या ‘या’ भक्तिगीताने रचला इतिहास, तब्बल ‘इतक्या’ अब्जावधी व्ह्यूजचा आकडा केला पार !
सदर व्हिडिओ 10 मे 2011 रोजी YouTube वर अपलोड करण्यात आला होता. 9 मिनिटे 41 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये हनुमान चालीसा आहे. या व्हिडिओमध्ये गुलशन कुमार दिसत आहेत. या चालीसाला हरिहरन यांनी आवाज दिला आहे.

ऋषभ | प्रतिनिधी

हनुमान आणि राम भक्त जगाच्या कानाकोपऱ्यात स्थायिक आहेत, राम भजन, श्री कृष्ण भजन हे सर्व YouTube वर तसेच अनेक प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत, परंतु भारतातील एकमेव भक्तीगीत अनेक वर्षांपासून यूट्यूबवर अधिराज्य गाजवत आहे. इथली भक्तिगीते भारतातच नाही तर परदेशातही खूप प्रसिद्ध आहेत. आज आपण T-Series च्या एका लोकप्रिय भक्तीगीताबद्दल जाणून घेणार आहोत. हे भक्तिगीत म्हणजे ‘हनुमान चालिसा’. हनुमान चालिसाच्या अनेक आवृत्त्या तुम्हाला YouTube वर पाहायला मिळतील. यातील सर्वात लोकप्रिय टी-सीरीजची ‘हनुमान चालीसा’ आहे ज्यामध्ये गुलशन कुमार दिसत आहेत. तसेच या ‘हनुमान चालीसाला’ हरिहरन यांनी आवाज दिला आहे.
T-Seriesचे अधिकृत ट्विट, मानले भाविक आणि प्रेक्षकांचे आभार
T-Series ला हा टप्पा गाठण्यात मदत केल्याबद्दल भाविक आणि प्रेक्षकांचे आभार मानत ट्विट केले, “हनुमान चालिसाने ३ अब्ज लोकांच्या हृदयात घर केले आहे. YouTube वर 3 अब्ज व्ह्यूज पार करणारा पहिला भारतीय व्हिडिओ बनवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.”
यापूर्वी ऑक्टोबर 2021 मध्ये या हनुमान चालीसाला यूट्यूबवर 2 अब्ज व्ह्यूज पूर्ण झाले होते. याचा आनंद साजरा करण्यासाठी गुलशन कुमार यांचे पुत्र निर्माता भूषण कुमार यांनी लंगरचे आयोजन केले होते. यावेळी भूषण कुमारची आई कृष्णा कुमार, बहीण तुलसी कुमार आणि खुशाली कुमारही उपस्थित होते.
T-Series अनेक भाषांमध्ये संगीत व्हिडिओ अपलोड करते. T-Series हिंदी, पंजाबी, भोजपुरी, तेलुगु, तमिळ, हरयाणवी, कन्नड, मराठी आणि गुजराती भाषेतील 29 चॅनेलवर बॉलिवूड, पॉप, भक्ती आणि क्लासिकसह विविध श्रेणींमध्ये संगीत व्हिडिओ अपलोड करते. टी सीरीजची स्थापना गुलशन कुमार यांनी केली होती.