आयएमए, फार्मा कंपन्यांना योगगुरुंचे 25 प्रश्न

Goan Varta Live | प्रतिनिधी
नवी दिल्ली: कोरोना रुग्णांवर सुरु असलेल्या एलोपॅथी उपचारांबाबत रामदेव बाबा यांनी एक वक्तव्य केलं होतं. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये रामदेव बाबा यांनी एलोपॅथी उपचारांबाबत अविश्वास दाखवल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर इंडियन मेडिकल असोसिएशन अर्थात आयएमएकडून रामदेव बाबा यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली. अखेर रामदेव बाबा यांनी आज त्यांचं हे वक्तव्य मागे घेत असल्याचं सांगितलं. पण आता पुन्हा एकदा त्यांनी एलोपॅथीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आयएमए आणि फार्मा कंपन्यांना 25 प्रश्न विचारले आहेत.
हेही वाचाः योगगुरु रामदेव बाबांविरुद्ध गुन्हा दाखल करा
रामदेव बाबा यांचे 25 प्रश्न
एलोपॅथीकडे हायपरटेन्शन (बीपी) आणि त्याच्या कॉम्प्लिकेशन्सवर कुठला स्थायी उपचार आहे का?
एलोपॅथीकडे टाईप – 1 आणि टाईप – 2 डायबिटीज आणि त्याच्या कॉम्प्लिकेशन्सवर कायमस्वरुपी उपचार आहे का?
फार्मा उद्योगाकडे थायरॉईय, आर्थराइटिस, कोलाइटिस, अस्थमा अशा समस्यांवर निर्दोष स्थानी उपचार आहे का?
एलोपॅथीकडे फॅटी लिव्हर आणि लिव्हर सिरोसिस, हॅपेटायटिस बरे करण्यासाठी औषध आहे का? ज्या प्रमाणे तुम्ही टी.बी. आणि चेचक आदींवर स्थानी समाधान शोधलं आहे. तसंच लिव्हरच्या आजारांवर उपाय शोधा. आता एलोपॅथी सुरु होऊन 200 वर्षे झाली आहेत, जरा सांगाल.
फार्मा उद्योगांकडून हर्ट ब्लॉकेजला रिव्हर्स करण्याचा उपाय आहे का? विना बायबास, विना शस्त्रक्रिया, विना एन्जोप्लास्टी कुठला स्थायी उपचार आहे का?
फार्मी उद्योगांमध्ये इनलार्ज हार्ट आणि इंजेक्शन-ई.एफ कमी झाल्यावर पेसमेकर न लावता, कोणता उपचार आहे जो हृदयाचा आकार आणि फंक्शन नॉर्मल करेल, त्याला कशाप्रकारे रिव्हर्स करु शकता, विना पेसमेकर त्याचा निर्दोष उपचार काय आहे?
कोलेस्ट्रॉलच्या रुग्णामध्ये कोलेस्ट्रॉल ट्रायग्लिसराइड्स कमी करण्याचा आणि लिव्हरवर साईड इफेक्ट रहित एलोपॅथीमध्ये काय उपचार आहे?
फार्मा कंपन्यांकडे डोकेदुखी आणि मायग्रेनवर काही कायमस्वरुपी उपाय आहे? ज्यामुळे सततची डोकेदुखी आणि मायग्रेन होणार नाही.
फार्मा कंपन्यांमध्ये डोळ्यांवरील चष्मा हटवण्याचा आणि हिअरिंग हेड जाईल, असा कोणता उपचार आहे का?
पायरिया झाल्यावर, ज्यामुळे दात हलने बंद होईल, हिरड्या मजबूत होतील, असं कोणतं औषध आहे का? ज्यामुळे कोट्यवधी लोक दुखी आहेत.
एका व्यक्तीचं रोज कमीत कमी अर्धा ते 1 किलो वजन कमी होईल. विना शस्त्रक्रिया बॅरियाट्रिक सर्जरी आणि लाईफोसेक्शन, कोणत्याही छेडछाडीविना, औषधं घ्या आणि वजन कमी करा, फार्मा इंडस्ट्रीकडे असं कुठलं औषध आहे का?
सोरायसिस, सोरायटिक अर्थरायटिस आणि पांढरे डाग यावर निर्दोष आणि स्थायी उपाय सांगा?
मॉडर्न मेडिकल सायन्समध्ये एक्लोजिंग स्पॉन्डिलायसिसवर कायमस्वरुपी उपाय आहे का? RA फॅक्टर पॉझिटिव्हला निगेटिव्ह करण्याचा उपाय आहे का?
एलोपॅथीकडे पार्किन्सनवर निर्दोष आणि कायमस्वरुपी उत्तर आहे का?
साईड इफेक्ट रहित कब्ज, गॅस, एसीडिटीवर फार्मा कंपन्यांकडे कायमस्वरुपी उपाय आहे का?
अनिद्रा, (इन्सोमनिया) लोकांना झोन येत नाही कारण तुमच्या औषधांचा परिणाम फक्त 4 ते 6 तासांसाठी राहतो. तो ही साईड इफेक्ट्ससह. एलोपॅथीमध्ये यावर कायमस्वरुपी उत्तर देता का?
स्ट्रेस हार्मोन्स कमी करण्यासाठी आणि गुड हार्मोन्स वाढवण्यासाठी, ज्यामुळे लोक तणावमुक्त आणि प्रसनन राहतील. फार्मा कंपन्या यासाठी एखादे औषध सांगतील का?
इन्फर्टिलिटीमध्ये कृत्रिम साधनांविना (टेस्ट ट्यूब बेबी, IVF) जी अतिशय वेदनादायी असते, एलोपॅथीमध्ये असे एखादे औषध सांगाल ज्यात या समस्यांचं समाधान मिळेल. ज्यामुळे विना टेस्ट ट्यूब बेबी, IVF नैसर्गिकरित्या गर्भधारणा होईल आणि लोकांचे पैसे वाचतील, असे एखादे औषध सांगाल का?
फार्मी कंपन्यांमध्ये ऐजिंग प्रोसेसला रिव्हर्स करणारे एखादे औषध सांगा.
एलोपॅथीमध्ये विना साईड इफेक्ट हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी निर्दोष उपाय सांगाल?
माणूस हिंसक, क्रूर आणि राक्षसी बनला आहे. त्याला माणूस बनवणारे एखादे औषध एलोपॅथीमध्ये आहे का?
माणसाला ड्रग्ज, अन्य नशेपासून दूर करु शकेल असं एखादं औषध एलोपॅथीमध्ये आहे का?
एलोपॅथी आणि आयुर्वेदातील वाद संपवण्यासाठी फार्मा कंपन्यांकडे एखादे औषध आहे का?
फार्मा कंपन्यांकडे कोरोना रुग्णाला विना ऑक्सिजन सिलिंडर ऑक्सिजनचं प्रमाण वाढवण्यासाठी कोणता उपाय आहे का?
एलोपॅथी सर्वशक्तिमान आणि सर्वगुण संपन्न आहे तर एलोपॅथीचे डॉक्टर आजारी पडताच कामा नयेत?
मैं इंडियन मेडिकल एसोसिएशन व फार्मा कंपनियों से विनम्रता के साथ सीधे 25 सवाल पूछता हूँ- pic.twitter.com/ATVKlDc9tl
— स्वामी रामदेव (@yogrishiramdev) May 24, 2021
रामदेव बाबा यांचा व्हायरल व्हिडीओ आणि वाद
कोरोना संकटाच्या काळात योगगुरु रामदेव बाबा यांच्या एका वक्तव्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये रामदेव बाबा यांनी कोरोनावरील एलोपॅथी उपचार पद्धतीबाबत अविश्वासार्हता दर्शवली आहे. त्याविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए)ने आक्रमक भूमिका घेतली होती. रामदेव बाबा यांच्यावर कारवाई कठोर कारवाई करण्याची मागणी आयएमएने केली होती. कोविड उपचार पद्धतीमध्ये फॅबीफ्लू आणि स्टेरॉईड्ससह अन्य अँन्टिबायोटिकही फोल ठरल्याचं वक्तव्य रामदेव बाबा यांनी केलं. त्याबाबतचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
D₹ + $cientist Ramdev doesn't want allopathy to be used in curing Corona patients 😐 pic.twitter.com/7l2NtKih5p
— Baba MaChuvera ( Nigeria wale ) ↗️ (@indian_armada) May 22, 2021
साथरोग नियंत्रण कायद्यानुसार कारवाईची मागणी
रामदेव बाबा यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतलेल्या आयएमएने थेट केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडेच दाद मागितली होती. केंद्रीय आरोग्यमंत्री यांनी एक तर हा आरोप स्वीकार करावा आणि आधुनिक उपचार पद्धती बंद करावी. नाहीतर मग रामदेव बाबा यांच्याविरोधात कारवाई करुन साथरोग नियंत्रण कायद्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आयएमएने केली होती. देशात कोरोना महामारीचा सामना करतोय. आधुनिक उपचार पद्धती आणि भारत सरकार मिळून लोकांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. या संकटाच्या काळात फ्रंटलाईनवर काम करणाऱ्या 1 हजार 200 एलोपॅथी डॉक्टरांनी बलिदान दिलंय, असंही आयएमएने आपल्या प्रेस नोटमध्ये म्हटलं होतं.