Tata-bisleri Deal: ‘बिसलरी’ कंपनीची विक्री होणार? कंपनीच्या विक्रीमागे आहे ‘हे’ कारण…

टाटा समूह बिसलरी कंपनी खरेदी करण्याची शक्यता

रजत सावंत | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट : भारताची सर्वात मोठी ‘पॅकेज वॉटर कंपनी’ ‘बिसलरी’ची विक्री होणार आहे. या व्यवहाराबाबत टाटा समुह आणि बिसलेरीच्या व्यवस्थापनाची मागील दोन वर्षांपासून चर्चा सुरू आहे. यानंतर लवकरच या निर्णयावर शिक्कामोर्तब होऊ शकतो. जवळपास गेल्या 30 वर्षांपासून थम्सअप, गोल्ड स्पॉट, लिम्का आणि कोका कोला यासारख्या सॉफ्ट ड्रिंकची विक्री बिसलरी कंपनी करत आहे. 
हेही वाचाःमहाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद; गाव तर सोडाच बेळगाव, निपाणी, कारवारही घेऊ

1965 मध्ये मुंबईत दुकान सुरू

बिसलरी हा मूळचा इटालियन ब्रँड होता. ज्याने 1965 मध्ये मुंबईत दुकान सुरू केले होते. चौहानांनी 1969 मध्ये ते विकत घेतले. कंपनीचे 122 ऑपरेशनल प्लांट आहेत (त्यापैकी 13 मालकीचे) आणि 4,500 वितरक आणि 5,000 ट्रकचे नेटवर्क संपूर्ण भारत आणि शेजारील देशांमध्ये आहे.
हेही वाचाःचुकीच्या मीटर रिडिंगमुळे भरमसाट पाणी बिल…

पुढील टप्प्यासाठी वारसदार नाही

माध्यमांमधील वृत्तानुसार, ८२ वर्षाच्या रमेश चौहान यांची प्रकृती मागील काही दिवसांपासून चांगली नाही. चौहान यांनी म्हटलं आहे की, बिसलेरीच्या विस्ताराच्या पुढील टप्प्यासाठी त्यांच्याकडे वारसदार नाही. त्यांची मुलगी जयंतीला या व्यवसायात रस नाही. बिसलेरी इंटरनॅशनल आणि टाटा कंझ्युमर प्रोडक्ट लिमिटेड यांच्यातील ही डील जवळपास 6000 ते 7000 कोटींची होण्याचा अंदाज आहे.
हेही वाचाःसरकारी नोकर भरतीबाबत मुख्यमंत्र्यांची महत्वपूर्ण घोषणा…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!