विरुष्काच्या घरी ‘धनाची पेटी’

Goan Varta Live | प्रतिनिधी
मुंबईः भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांना कन्यारत्न प्राप्त झालंय. विरुष्काच्या घरी नन्ही परीचं आगमन झालंय. विराट आणि अनुष्काचं हे पहिलं बाळ आहे. त्यामुळे त्यांचे चाहते फार आनंदात आहेत. स्वतः विराट कोहलीने सोशल मीडियावर याबाबत माहिती दिलीये. ११ जानेवारी २०२१ रोजी ब्रीच कॅण्डी इस्पितळात अनुष्काने बाळाला जन्म दिलाय. आज सकाळीच अनुष्का आणि विराट नेहमीच्या चेकअपसाठी इस्पितळात गेले होते.
विराटचं ट्विट
विराटनं ट्विट केलंय, “तुम्हाला सांगताना आनंद होतोय की आज दुपारी आमच्या घरी एक गोंडस परी आलीये. तुमच्या प्रेमाचा, प्रार्थनेचा आणि शुभेच्छांचा मी आभार मानतो. अनुष्का आणि मुलगी दोन्ही ठणठणीत आहेत आणि आमच्या आयुष्यातील नव्या प्रवासाची सुरुवात झालीये. आशा करतो तुम्ही आमच्या प्रायव्हसीचा आदर कराल. तुमचा विराट.”
— Virat Kohli (@imVkohli) January 11, 2021
अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने केलं मुलीचं स्वागत
फार कमी लोकांना माहीत आहे की अनुष्का आणि विराटच्या मुलीला ‘करोनिएल’ म्हणून संबोधलं जाईल. याचं मुख्य कारण म्हणजे करोना काळात जन्माला आलेल्या बाळांना ‘करोनिएल’ या विशेष नावाने संबोधलं जातं. एवढंच नाही तर या महामारीच्या काळात जन्मलेल्या बाळांना ‘कोविड- किड’ असंही काही ठिकाणी म्हटलं जातं.
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी २०१७ मध्ये इटलीत लग्न केलं होतं. काही दिवसांपूर्वी अनुष्काने वोग या मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत बाळाच्या संगोपनाबाबतची माहिती दिली होती. मी प्रगतीशील कुटुंबातून आली आहे. जिथे लहान मुलांचे सर्व लाड पुरवले जातात. त्यासोबतच त्यांना इतरांचा आदर करण्यासही शिकवलं जातं. तुम्हाला मुलांसाठी स्वतः हे स्ट्रक्चर तयार करावं लागेल. आम्हाला आमच्या मुलाला मस्तीखोर बनवायचं नाहीये. मी आई होण्यापूर्वीपासूनच याचा विचार करत होते, असं अनुष्का म्हणाली.