त्यामुळे साथीचे व्रण कायमचे राहणार आहेत…

करोना संशोधन गटाच्या प्रमुखांचा राजीनामा; सरकारी धोरणांविषयी व्यक्त केलेली नाराजी

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः साथरोगतज्ज्ञ शाहीद जामील यांनी केंद्र सरकारने स्थापन केलेल्या सार्स-कोव्ही-2 जीनोमीत कॉनसर्टीयाच्या (आयएसएसीओजी) प्रमुख पदावरुन राजीनामा दिलाय. भारतामधील करोना विषाणूंच्या जीनोम सिक्वेन्सिंग म्हणजेच रचनेसंदर्भात सरकारला सल्ला देण्यासाठी काही वैज्ञानिकांचा समावेश असणारा हा गट स्थापन करण्यात आला होता. जामील हे या गटाचे प्रमुख होते. मात्र मध्यरात्रीच्या सुमारस त्यांनी हे पद सोडत असल्याचं जाहीर केलं. जामील यांनी अशाप्रकार तडकाफडकी राजीनामा देणं हा सरकारसाठी मोठा झटका असल्याचं मानलं जात आहे. अनेक विषयांवरुन जामील यांची मत ही सरकारच्या सध्याच्या धोरणांपेक्षा वेगळी होती तसंच ते या गटाचे प्रमुख असेल तरी सरकारच्या धोरणांवर सडेतोड शब्दांमध्ये टीका करत असल्याचं मागील काही काळापासून दिसून येत होतं.

करोना संशोधन गटाचे प्रमुख

देशामध्ये करोना विषाणूचे अनेक प्रकार आढळून आल्यानंतर जानेवारीमध्ये आयएसएसीओजीची स्थापना करण्यात आलेली. विषाणूमध्ये होणारा बदल आणि त्यासंदर्भातील सल्ला केंद्राला देण्यासाठी वैज्ञानिकांच्या या गटाची स्थापना करण्यात आली होती. यामध्ये देशभरातील वेगवेगळ्या भागातून विषाणूंची रचना समजून घेण्यासाठी सॅम्पल गोळा करून दहा प्रयोगशाळांमध्ये त्यांच्यावर अभ्यास केला जायचा. जानेवारीत हा गट स्थापन करण्यात आला तेव्हा त्याला सहा महिन्यांची मुदत देण्यात आलेली जी नंतर वाढवण्यात आली. भारतामधील जिनोम रचना अभ्यास आणि संशोधनाच्या कामाने आयएसएसीओजीच्या स्थापनेनंतर बरीच गती पकडली होती.

हेही वाचाः 21 खाजगी इस्पितळांच्या 50 टक्के खाटांचा ताबा महिनाभर सरकारकडे

कोरोनाला रोखण्यात सरकार कमी पडल्याची जामील यांची टीका

जामील हे प्रसिद्ध शास्त्रज्ञ असून ते या करोनाच्या साथीसंदर्भात मुक्तपणे आपली मतं मांडत असतात. द इंडियन एक्सप्रेससाठीही जामील यांनी काही लेख लिहिले आहेत. मागील आठवड्यामध्येच ते वृत्तपत्राने आयोजित केलेल्या एक्सप्लेन्ड या कार्यक्रमाला उपल्थित होते. वैज्ञानिक विषयांवर बोलण्यामध्ये जामील यांचा हातखंड आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव रोखण्यात, कमी करण्यात केंद्र सरकार कमी पडल्याची टीका जामील यांनी अनेकदा केलीय.

हेही वाचाः विद्यमान सरकार राज्यासाठी पातकी

आणि आरोग्य सुविधा देणारी केंद्र बंद केली

जामील यांनी नुकतंच एका वृत्तपत्राशी बोलताना सांगितलं, सरकारी यंत्रणांना करोना जानेवारीमध्ये संपला आहे असं वाटलं आणि त्या बेजबाबदार झाल्या. त्यामुळेच त्यांनी तात्पुरत्या स्वरुपात महिनाभरापूर्वी उभारलेल्या अनेक आरोग्य सुविधा देणारी केंद्र बंद केली.

हेही वाचाः मुंबईला जाणाऱ्या पावलो बसचा ओरोसजवळ गंभीर अपघात

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिले होते सल्ले

नुकताच त्यांनी ‘न्यू यॉर्क टाइम्स’साठी लेख लिहिला होता. ज्यामध्ये त्यांनी चाचण्यांची संख्या वाढवणे आणि लोकांना आयसोलेट करण्याचं प्रमाण वाढवण्याची शिफारस केली होती. तसंच देशामध्ये तात्पुरत्या स्वरुपात अधिक बेड्स आणि इतर सुविधा निर्माण करण्याची गरज असल्याचंही त्यांनी या लेखात म्हटलं होतं. निवृत्त डॉक्टर आणि नर्सची मदत घेतली पाहिजे, पुरवठा साखळी मजबूत करुन औषधं आणि ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत केला पाहिजे, असे सल्लेही जामीलयांनी दिले होते.

हेही वाचाः घरोघरी जाऊन कोरोनासंबंधीच्या चाचण्या, तपासणी करा !

त्यामुळे साथीचे व्रण कायमचे राहणार आहेत

भारतात या अशा उपाययोजना केल्या पाहिजेत असं माझ्या सहकाऱ्यांचही मत आहे. मात्र या उपाययोजनांना पुराव्यावर आधारित धोरणं तयार करणाऱ्या यंत्रणांकडून विरोध केला जातोय. आकडेवारीवर आधारित निर्णय घेणे हा आणखीन एक गोंधळ देशात आहे. देशामधील करोनाची परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेलीय. माणसांच्या रुपाने आपण जे काही गमावतोय त्यामुळे या साथीचे व्रण कायमचे राहणार आहेत, असा युक्तीवाद जामील यांनी केला होता.

हेही वाचाः खाजगी इस्पितळांबाबतचा निर्णय कितपत योग्य ?

तुम्ही ठरवा कोणाला ऑक्सिजन दिला पाहिजे

मात्र त्याचवेळी जामीलहे सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या निर्णयाचाही विरोध करत होते. ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना करण्याचा निर्णय त्यांना पटला नव्हता. हे खरोखरच दुर्दैवी आहे. आपल्याकडे आधीच डॉक्टर्सची कमतरता आहे. त्यात आपण आपले सर्वात चांगल्या डॉक्टरांना तुम्ही ऑक्सिजन-ऑक्सिजन खेळा असं सांगितलं आहे. तुम्ही ठरवा कोणाला ऑक्सिजन दिला पाहिजे. हे खरोखर आमच्यासाठी दुःखद दिवस आहे. हे डॉक्टर्स त्याच्या औषधांसाठी आणि उपचारांसाठी प्रसिद्ध आहे. मात्र ऑक्सिजन आणि त्याचा पुरवठा आणि आकडेवारीसंदर्भात त्यांना काय माहितीय?, असा प्रश्न जामील यांनी उपस्थित केलेला.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!