VIRAL VIDEO | मोदीजी, आम्ही शिक्षणाची कुर्बानी द्यायला तयार आहोत

व्हिडिओ वायरल; दोन चिमुकल्यांची थेट पंतप्रधानांना साद

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्ली: जिवघेण्या कोरोना विषाणूने जगात हाहाकार माजवला आहे. भीषण प्रकारच्या थैमानात मोठ्या प्रमाणावर जिवीतहानी झाली. या जिवीतहानीबरोबरच वित्तहानीही झाली. जिवीत आणि वित्तहानीबरोबरच आणखी एक भीषण नुकसान झालं आहे ते म्हणजे शैक्षणिक नुकसान झालं आहे. कोरोना संसर्गाचा धोका रोखण्यासाठी सरकारने विविध प्रकारचे निर्बंध लागू केलेत. शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याची नामुष्की सरकारवर ओढवली आहे. आपल्या भारतात कोरोना विषाणूने गेल्या वर्षी शिरकाव केला. तेव्हापासून शाळा बंद आहेत. सरकारने चालू वर्षाच्या सुरुवातीला कोरोनाची रुग्णसंख्या कमी होऊ लागल्यानंतर अनलॉकची सुरुवात केली. मात्र विविध निर्बंध शिथील करताना शाळा-महाविद्यालये बंद केली. यात मुलांचं शैक्षणिक नुकसान होत आहे.

हेही वाचाः मानव-वन्य प्राण्यामधला संघर्ष टाळण्यासाठी 100 नव्या जलसाठ्यांची निर्मिती

याबाबत एकीकडे पालक मंडळींमध्ये नाराजीचा सूर आहे. पण विद्यार्थी खुशीत आहेत. कारण त्यांना पहिल्यांदाच इतकी मोठी सुट्टी मिळाली आहे. या सुट्टीत शाळांनी ऑनलाईन शिक्षण सुरू केलं आहे. मात्र प्रत्यक्ष शाळेत जाऊन शिकण्याचा आनंद ऑनलाईन शिक्षणातून मिळत नाहीये. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियात एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओतील दोन चिमुकल्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना साद घातली आहे. त्यांचा हा व्हिडीओ पाहून तुम्ही नक्की खूश व्हाल.

हेही वाचाः 65 मच्छिमारांना मिळाली नुकसान भरपाई

व्हिडिओमध्ये नेमके काय आहे?

व्हिडिओमध्ये दोन लहान मुलं आहेत. सध्याच्या कोरोनाच्या लॉकडाऊन काळात शाळा बंद असल्यामुळे आनंदून गेली आहेत. याच आनंदाच्या भरात त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना साद घालत हा व्हिडिओ बनवला आहे. मोदीजी आम्ही शिक्षणाची कुर्बानी द्यायला तयार आहोत, असं एक मुलगा म्हणत आहे, तर दुसरा मुलगाही अशाच आशयाची तयारी दाखवत आहे. मोदीजी तुम्हाला जर शाळा पुढील सात वर्षं बंद ठेवायच्या असतील, तर बंद ठेवा शाळा, आम्ही तयार आहोत, अशी भावना दुसरा मुलगा व्यक्त करीत आहेत. या दोन मुलांनी पंतप्रधान मोदींना केलेलं आवाहन सोशल मीडियात चांगलंच व्हायरल होत आहे.

हेही वाचाः 57 लाख 75 हजाराचे सोने ‘दाबोळी’वरून जप्त

सध्या सर्वच मुलांच्या मनात शाळाविषयी हीच भावना तयार झाली आहे. त्यामुळे या मुलांचा व्हिडीआ सोशल मीडियात अधिकाधिक शेअर केला जात आहे. मोदीजी तुम्ही शाळा बंद ठेवा, आम्हाला काहीही अडचण नाही, ही मुलांची भावना अधिक लोकांना आवडली आहे. कारण ही भावना प्रत्येक मुलाची आहे. नेमक्या आवाहनानंतरही तरी सरकार मुलांच्या शैक्षणिक नुकसानीचा विचार करेल, असं पालकांना वाटत आहे. हा व्हिडिओ तुम्हीही पहा आणि मुलांच्या धम्माल आवाहनाचा आनंद लुटा.

हेही वाचाः राज्यात शोकाकुल वातावरण; भाजप टीका उत्सव कार्यक्रमाच्या उद्घाटनात व्यस्त

हजारो लोकांनी पाहिला व्हिडिओ

हा मुलांचा व्हिडिओ तब्बल 74 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे. ट्विटर ‘भैय्याजी’ नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे. या व्हिडिओवर युजर्सकडून अनेक धम्माल प्रतिक्रिया नोंदवल्या जात आहेत. लहान मुलांमध्ये किती कल्पकता आहे याचा प्रत्ययदेखील या व्हिडिओमधून येत आहे.

पहा व्हिडिओ

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!