VIRAL VIDEO | पोपटाने गिटारच्या धूनवर गायलं भन्नाट गाणं

नेटकरी हैराण, लाखों युजर्सनी पाहिला व्हिडिओ

Goan Varta Live | प्रतिनिधी

मुंबई : पोपट माणासाप्रमाणे बोलतो, भविष्य सांगतो असं तुम्ही ऐकलं असेल. पण गिटारच्या धूनवर गाणं गाणारा पोपट पाहिलाय का? हो असा एक पोपट आहे. ‘Tico The Parrot’ अशा नावाने प्रसिद्ध असणाऱ्या या पोपटाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. 33 सेंकदाचा हा व्हिडीओ आतापर्यंत सुमारे 3 लाखांहून अधिक नेटकऱ्यांनी पाहिला आहे.

हा व्हिडिओ पहाः VIRAL VIDEO : शिकारीचा थरार कॅमेऱ्यात कैद

काय आहे व्हिडीओ?

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओत एक व्यक्ती गिटार हातात घेऊन वाजवत आहे. त्याचवेळी त्याच्यासमोर बसलेला एक पोपट गिटारच्या धुनवर सूर लावून गाण गाण्याचा प्रयत्न करतोय. हा पोपट क्लासिक रॉक धुनमध्ये गाण्याचा प्रयत्न करताना दिसून येतोय. ‘Tico The Parrot’ असं या प्रसिद्ध पोपटाचं नाव असून @rtnordy या अकाऊंटवरुन हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे.

पहा व्हिडिओ

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!