VIRAL VIDEO | दिल्लीत माकडाचा ‘मेट्रो’ प्रवास

प्रवाशांचं केलं मनोरंजन; सोशल मीडियावर व्हिडिओ वायरल

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्लीः दिल्ली-एनसीआरची लाईफलाईन ‘दिल्ली मेट्रो’मध्ये दररोज असंख्य प्रवासी प्रवास करतात. परंतु दिल्ली मेट्रोच्या आनंद विहार-द्वारका मार्गावर माकडाच्या मेट्रोतील प्रवेशाचा आणि नंतर प्रवासाचा व्हिडिओ सध्या प्रचंड वायरल होत आहे. सोशल मीडियावर वायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये मेट्रो कोचमध्ये घुसलेलं हे माकड केवळ रेल्वेच्या आलिशान प्रवासाचा आनंद घेत नाही, तर त्या दरम्यान गोलांट्या मारतानाही दिसतंय.

हेही वाचाः KARNATAKA UNLOCK : बेळगावसह 16 जिल्हे सोमवारपासून ‘अनलॉक’

घाबरेल्या प्रवाशांनी केलं माकडासोबत एन्जॉय

सुरुवातीला घाबरलेले प्रवासीसुद्धा त्याच्याबरोबर थोड्या वेळानंतर एन्जॉय करताना दिसतायत, तरीही मेट्रोचा एक प्रवासी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचार्‍यांना फोन करून मेट्रोमध्ये माकड घुसल्याचं सांगा, असं बोलताना दिसतोय. त्याचवेळी व्हिडिओमध्ये असं दिसून आलंय की कधी कधी हे माकड प्रवाशांच्या जवळ बसतंय, तर काही वेळा ते मेट्रो कोचच्या आत फिरताना दिसतंय. माकड इकडे तिकडे डब्यात फिरतानाही दिसतंय, जणू काही ते एखाद्या तपासणी अधिकाऱ्याप्रमाणे तपासणी करतंय.

सोशल मीडियावर व्हिडिओ वायरल

इंटरनेट मीडियाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दिल्ली मेट्रोच्या ब्लूलाईन मार्गावर धावणाऱ्या ट्रेनमध्ये घुसलेल्या माकडाचा एक व्हिडिओ शनिवारी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही वेगळी बाब आहे की हा व्हिडिओ कधीचा आहे याची पुष्टी दिल्ली मेट्रोच्या अधिकाऱ्यांना करता आलेली नाही.  

व्हिडिओ इंटरनेट मीडियावर जोरदार व्हायरल

इंटरनेट मीडियावर वायरल झालेल्या व्हिडिओमध्ये माकड सहजपणे दिल्ली मेट्रोच्या कोचमधील आसनावर बसलेलं दिसतंय. असं सांगितलं जातंय की दिल्ली मेट्रोच्या डब्यात बसलेल्या एका व्यक्तीने माकड चालण्याचा हा व्हिडिओ बनविला होता जो आता मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे.

मेट्रो प्रवाशांना मेट्रोत माकड पाहून आश्चर्य वाटलं

त्याचवेळी आनंद विहार ते द्वारका दरम्यान धावणाऱ्या मेट्रोतील प्रवासी मेट्रो डब्याच्या मधोमध माकड सापडल्यानं आश्चर्यचकित झाले.  हे माकड ब्लूलाईनच्या ट्रेनमध्ये प्रवाशांमध्ये फिरत असल्याचं व्हिडिओत स्पष्ट दिसतंय.  व्हिडिओमध्ये असं दिसून आलंय की जेव्हा ट्रेन यमुना बँक मेट्रो स्थानकातून जात आहे, तेव्हा हे माकड अधिक सक्रिय होतं. 

हेही वाचाः गोवेकरांची कळकळीची मागणी!

प्रवाशांचं मनोरंजन केलं

इंटरनेट मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये माकड प्रथम पाईपच्या सहाय्याने कोचच्या आत चढलं. यानंतर, हँडल वरच्या बाजूस धरून पुन्हा खाली येतं. एवढंच नाही तर डब्यात फिरल्यानंतर हे माकड येऊन प्रवाशाच्या शेजारी रिकाम्या सीटवर बसतं. 

व्हिडिओ पहा

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!