VIRAL VIDEO | इवल्याशा कासवाने केले  जंगलाच्या राजाला हैराण

पाणी पिताना सिंहाची झाली चांगलीच फजिती

Goan Varta Live | प्रतिनिधी

मुंबई: सोशल मीडियावर रोजच लाखो व्हिडीओ अपलोड केले जातात. यातील काही व्हिडिओ हे अतिशय मजेदार तर काही व्हिडीओ हे थरारक असतात. प्राण्यांच्या व्हिडीओंना सोशल मीडियावर विशेष पसंती मिळते. त्यामुळेच की काय सध्या सिंहाचा आणि कासवाचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये इवल्याशा कासवाने एवढ्या मोठ्या सिंहाला हैराण करून सोडलं आहे.

हेही वाचाः VIRAL VIDEO | पक्ष्याने बांधलं एका पानावर घरटं, व्हिडीओ एकदा पाहाच

कासवाच्या पिलामुळे सिंह हैराण

असं म्हणतात की सिंह हा जंगलाचा राजा असतो. त्याला पाहून इतर प्राणी हे सैरावैरा पळतात. त्याच्या वाटेला जाण्याचा कोणीही प्रयत्न करत नाही. मात्र, सध्या असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे जो आपल्या सर्वांनाच चकित करणारा आहे. एका कासवाच्या पिलामुळे सिंह चांगलाच हैराण झाला. त्याला हे छोटंसं कासव पाणी पिऊ देत नाहीये.

हेही वाचाः VIRAL VIDEO | मोदीजी, आम्ही शिक्षणाची कुर्बानी द्यायला तयार आहोत

व्हिडीओमध्ये काय आहे ?

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ नेमका कोणत्या जंगलातील आहे, याबाबत निश्चित माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, या व्हिडीओमध्ये दिसतं त्याप्रमाणे एक सिंह तहानलेला असल्यामुळे तो पाणी पिताना दिसतोय. तो तन्मयतेने पाणी पित आहे. मात्र, याच वेळी पाण्यातून कासवाचे एक छोटंसं पिल्लू सिंहाकडे येत आहे. एवढंच नव्हे, तर हे छोटंसं कासव सिंहाच्या तोंडाजवळ जाऊन त्याच्या खोड्यासुद्धा काढत आहे.

हेही वाचाः VIRAL VIDEO | पोपटाने गिटारच्या धूनवर गायलं भन्नाट गाणं

छोट्याशा कासवाकडून सिंहाला त्रास

कासवाच्या पिलाचा हा प्रताप पाहून सिंह वैतागल्याचे वाटतेय. हा सिंह कासवापासून दूर जाऊन लगेच दुसऱ्या ठिकाणी पाणी पित आहे. पण याही ठिकाणीसुद्धा कासवाचं पिल्लू आल्याचं दिसतंय. दुसऱ्या ठिकाणीसुद्धा कासवाचं पिल्लू सिंहाला त्रास देत आहे. सिंह मात्र बिचारा गप्प बसला आहे.

हेही वाचाः VIRAL VIDEO : शिकारीचा थरार कॅमेऱ्यात कैद

पाहा व्हिडीओ :

लोकांच्या भन्नाट कमेंट्स

कासवाच्या पिलाची हीच हिम्मत अनेकांना आवडली आहे. लोक हा व्हिडीओ पाहून उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया देत आहेत. तसंच हा मजेदार व्हिडीओ ते आपल्या अकाऊंटवर शेअरसुद्धा करत आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!