VIRAL VIDEO: आधी मोबाईल फोडला, नंतर थोबाडीत मारली

छत्तीसगडच्या सुरजापूरचे कलेक्टरचा व्हिडिओ झाला वायरल; एका व्यक्तीला विनाकारण केली मारहाण

Goan Varta Live | प्रतिनिधी

रांची: कोरोनाकाळात एकीकडे डॉक्टर आणि सरकारी अधिकारी निष्ठेने आणि जीव ओतून काम करताना दिसत आहेत. मात्र, त्याचवेळी काहीजण सरकारी अधिकाऱ्यांची प्रतिमा मलीन करताना दिसत आहेत. छत्तीसगढमध्ये नुकताच एक असा प्रकार समोर आला. याठिकाणी छत्तीसगडच्या सुरजापूरचे कलेक्टर रणबीर शर्मा यांनी एका व्यक्तीला विनाकारण केलेली मारहाण सध्या चर्चेचा विषय आहे. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच वायरल होत आहे.

नक्की काय आहे व्हिडिओ; तुम्हीच पहाः

या व्हीडिओत सूरजापूरचे जिल्हाधिकारी एका व्यक्तीवर दादागिरी करताना दिसत आहेत. या व्यक्ती त्यांच्याकडे गयावया करत असताना त्यांनी प्रथम त्या व्यक्तीला मोबाईल जमिनीवर आटपून फोडला. त्यानंतर या व्यक्तीने जाब विचारला तेव्हा कलेक्टरने या व्यक्तीच्या कानाखाली मारली. एवढंच नव्हे तर आजुबाजूला असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनाही त्याने व्यक्तीला झोडून काढा, असं सांगितलं. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत. अनेकजण कलेक्टरने गेलेल्या अधिकारांच्या गैरवापराविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!