VIRAL VIDEO | लग्नाच्या वाढदिवशी करायला गेले काहीतरी भन्नाट

व्हिडिओ वायरल झाल्यानंतर आलं पोलिसांचं बोलावणं

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट: सोशल मीडियावर लोक कायम काही ना काही व्हिडीओ टाकतच असतात. त्यात जन्मदिवस, लग्नाच्या वाढदिवस कसा धूमधडाक्यात साजरा केला याचे व्हिडीओ नेहमीच व्हायरल होत असतात. अशातच एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका महिलेनं गुडघ्यापर्यंत सोन्याचा लांब हार घातलेला दिसत आहे. त्यासोबतच तिचा नवरा तिच्यासाठी गाणं म्हणताना दिसत आहे. तेव्हा त्याच्या बायकोच्या गळ्यातल्या हाराची चर्चा सगळीकडेच रंगली आहे. तो हार तब्बल 1 किलोचा असल्याचं बोललं जात आहे. लॉकडाउनमुळं सोन्याचे भाव गगनाला टेकलेले आहेत त्यात त्यानं खरंच हा सोन्याचा हार बायकोला भेट म्हणून दिला असेल का?, असा प्रश्न सगळ्यांना पडत आहे. तेव्हा या प्रश्नाच उत्तर स्वत: व्हिडीओतल्या व्यक्तीनं दिलं आहे.

हेही वाचाः सामाजिक दायीतवाची पूर्ती

काय आहे व्हिडीओ?

फक्त फेसबुकच नाही, तर व्हॉट्सअॅप ग्रुपमध्येही एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये लाल साडी नेसलेली महिला गुडघ्यापर्यंत लांब सोनेरी हार घातलेली दिसत आहे. तिच्यासोबत नवरा ‘प्यार हमारा अमर रहेगा, याद करेगा जमाना’ हे ‘मुद्दत’ सिनेमातील गाजलेलं गाणं गात आहे. नवऱ्याच्या गळ्यातही सोन्याची चेन आहे. त्यांच्यासमोर टेबलवर केक कापलेला दिसत आहे. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त दोघं सेलिब्रेशन करत असल्याचं व्हिडीओवरुन वाटतं.

हेही वाचाः मासळी खरेदीसाठी सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा

पोलिसांचा व्हिडिओतील व्यक्तीला फोन

व्हिडिओ वायरल झाल्यानंतर या व्हिडीओत दिसणाऱ्या बाईच्या गळ्यात दिसणारा भरजरी हार पाहून सगळेच अवाक झाले आहेत. विशेष म्हणजे पोलीसही चक्रावले असून त्यांनी व्हिडिओतील व्यक्तीला भेटीसाठी पोलीस स्टेशनला बोलावलं. चोऱ्यांचं प्रमाण वाढल्यामुळे काळजी घ्या, सोन्याच्या दागिन्यांचं सोशल मीडियावर प्रदर्शन करु नका, ती घरात किंवा बँकेच्या लॉकरमध्ये सुरक्षित ठेवा, असा सल्ला पोलिसांना द्यायचा होता. मात्र त्या व्यक्तीचं उत्तर ऐकून पोलीसच गपगार झाले.

तो हार नकली

वायरल झालेला हा व्हिडिओ कल्याणमधील कोनगावचे रहिवासी बाळू कोळी यांचा आहे. पोलिसांनी कोळी यांना फोन करून पोलिस स्टेशनवर बोलवलं असता कोळींनी तो हार सोन्याचा नसून खोटा आहे, असं सांगितलं. तो हार मी अनेक वर्षांपूर्वी घेतला होता. त्याची किंमत 38 हजार रुपये आहे. बायकोने तो आमच्या अॅनिव्हर्सरीला घातला होता, असं कोळींनी सांगितलं. पोलिसांनी त्या हाराची कल्याणमधील एका ज्वेलरकडून तपासणी करुन घेतली. तो हार सोन्याचा नसल्याची ज्वेलरनेही पुष्टी दिली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!