VIRAL VIDEO । ‘इस मोड से जाते है…’; डॉक्टरांचं गाणं ऐकूण रडणारं बाळ झालं शांत

बाळाला झोपवण्यासाठी डॉक्टरांनीच गायली अंगाई

Goan Varta Live | प्रतिनिधी

धुळे: गेल्या वर्षभरात डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी समाजासाठी उपसलेल्या कष्टांना तोडच नाही. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर या सगळ्यांवरील भार आणखीनच वाढला असला तरी हे सर्वजण आपले कर्तव्य पार पाडत आहेत. सध्या सोशल मीडियावर धुळ्यातील एका डॉक्टरांचा  व्हीडिओ व्हायरल होत आहे.

हेही वाचाः VIRAL VIDEO: आधी मोबाईल फोडला, नंतर थोबाडीत मारली

अवघं 900 ग्रॅम वजनाचं बाळ

धुळ्याच्या निओनॅटल इंटेसिव्ह केअर युनिटमधील (NICU) डॉ. अभिनय दरावडे यांनी फेसबुकवर एक व्हीडिओ शेअर केला आहे. त्यांच्या रुग्णालयात नुकतंच एक बाळ जन्माला आलं आहे. या बाळाचं वजन अवघं 900 ग्रॅम इतकं आहे. वजन कमी असल्यामुळे सुरुवातीचे काही दिवस या बाळाची प्रकृती नाजूक होती. मात्र, डॉक्टरांच्या प्रयत्नानंतर आता बाळाची प्रकृती व्यवस्थित झाली आहे.

डॉक्टरांचं गाणं ऐकूण रडणारं बाळ झालं शांत

काही दिवसांपूर्वी हे बाळ रात्रीच्यावेळी जोरजोरात रडू लागलं. काही केल्या बाळ शांत व्हायला तयार नव्हते. तेव्हा डॉ. अभियन दरावडे यांनी गाण गायला सुरुवात केली. ‘इस मोड से जाते है… कुछ सुस्त कदम रस्ते, कुछ तेज कदम राहे’ या गाण्याच्या ओळी म्हटल्यानंतर बाळ रडायचं थांबलं. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!