VIRAL VIDEO | मगरीची शतपावली; गावभर फिरली

मगरीचा गावातून फेरफटका मारतानाचा व्हिडिओ पाहून बसेल धक्का

Goan Varta Live | प्रतिनिधी

दांडेलीः गोव्यात भर रस्त्यात, शाळेच्या आवारात मगर आढळल्याच्या घटना काही दिवसांपूर्वी समोर आल्या होत्या. दरम्यान, आता आणखी एक व्हिडीओ समोर आलाय. यात तर मगर चक्क गावात शतपावली करताना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

कर्नाटकातील कोगीलबन गावातील व्हिडिओ वायरल

कर्नाटकातील कोगीलबन गावात गुरुवारी सकाळी मगर शिरली. त्यामुळे गावात एकच खळबळ माजली. मगर निदर्शनास आल्याने येथील सुज्ञ नागरिकांनी मगरीला नदीकडे हुसकावून लावलं. काही नागरिकांनी मगरीचे फोटो काढले, तर काहींनी व्हिडिओ करून व्हायरल केले.

गुरुवारी दिवसाढवळ्या गावात फिरताना दिसली मगर

दांडेली शहराला लागून असलेल्या दक्षिण भागातील काळी नदीच्या काठावर कोगीलबन गाव आहे. या नदीच्या पात्रात सतत मगरींचा वावर असतो. मगरींची संख्या वाढलेली असून मगरी अन्नाच्या शोधात नदीपात्राबाहेर येत आहेत. गुरुवारी दिवसाढवळ्या मगर कोगीलबनच्या एका गल्लीत निदर्शनाला आली. यावेळी नागरिकांनी सुरुवातीला फोटो व व्हिडिओ काढले. त्यानंतर ज्या वाटेने मगर आली त्या वाटेनेच नागरिकांनी मगरीला हुसकावून लावलं.

काळी नदीचं पात्र आणि कोगीलबन गावचे अंतर 50 फुटाहून कमी आहे. काही नागरिकांच्या घरांचं परसू नदीच्या पात्राला लागून आहेत. परसूंमध्ये मगरी ऊन्हात येऊन बसत असतात. असे प्रकार येथे वरचेवर पहावयास मिळतात.

व्हिडिओ पहाः

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!