रक्ताच्या नात्याला काळिमा फासणारी घटना

वडिलांच्या अस्थी नेण्यासाठी आलेल्या मुलांमध्ये स्मशानभूमीतच प्रॉपर्टीवरून जोरदार भांडण

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः कोरोना काळात राजस्थानच्या भीलवाडामधून रक्ताच्या नात्यावर काळिमा फासणारी एक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर प्रॉपर्टीवरून तीन भाऊ स्मशानभूमीतच आपसात भिडले. हे काही सामान्य भांडण नव्हतं, तर तिघांनीही एकमेकांवर चपला आणि बुक्यांचा मारा केला. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी स्थिती सांभाळली. यादरम्यान तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी या फ्री स्टाइल हाणामारीचा व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हायरल व्हिडीओवर लोक वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. वडिलांच्या मृत्यूच्या तिसऱ्या दिवशी घडलेल्या या घटनेची भीलवाडामध्ये चर्चा सुरू आहे. याप्रकरणी कोणतीही पोलीस तक्रार करण्यात आलेली नाही.

हेही वाचाः दोडामार्गजवळ गोवा नंबर प्लेटच्या सॅन्ट्रो कारचा अपघात, पण…

स्मशानभूमीत प्रॉपर्टीवरून वाद

भीलवाडाचं उपनगर सांगानेर पोलीस स्टेशनचे प्रभारी देवीलाल यांनी सांगितले की, येथील वयोवृद्ध प्रताप रावचा मृत्यू झाला होता. वडिलांच्या मृत्यूनंतर तिसऱ्या दिवशी बुधवारी त्यांची तीन मुले धर्म सिंह राव, पप्पू राव आणि रघुनात राव अस्थी वेचण्यासाठी स्मशानभूमीत गेले होते. दरम्यान काळ-वेळ, परिस्थीती विसरून तिघेही भाऊ कौटुंबिक प्रॉपर्टीवरून आपसात भिडले.

पोलिसांनी थांबवलं भांडण

बघता बघता तिघेही एकमेकांना लाथा – बुक्यांनी मारू लागले होते. दरम्यात तिथे एका दुसऱ्या अंत्यसंस्कारासाठी काही लोक आले होते. त्यांनी या तीन भावांचं भांडण सोवण्याचा प्रयत्न केला. पण काही होऊ शकलं नाही. नंतर काही लोकांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तिघांना वेगळं केलं. त्यांना समजावून घरी परत पाठवण्यात आलं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!