VIRAL | “ऑफिसचे काम महत्वाचे आहे की जीवन?”बाईकवर… वाचा नक्की काय आहे प्रकरण

Goan Varta Live | प्रतिनिधी
ब्युरो रिपोर्ट : मोबाईल फोन तसेच लॅपटॉप आपल्यासाठी फायदेशीर आहे तसेच हानिकारक आहे. याचा आपल्यावर कसा परिणाम होईल हे आपण त्या उपकरणांचा वापर कसा करतो यावर अवलंबून आहे. जरी या उपकरणांचे फायदे असंख्य असले, तरी त्याचे कटु सत्य हे आहे की ती हानिकारक देखील तितकीच आहेत. असाच एक फोटो बंगळुरच्या हायवेवर पहायला मिळतो. एका वृत्तवाहिनीने हा फोटो शेअर केला आहे.
हेही वाचा:ओबीसीमधील १९ घटकांना आरक्षण निश्चित…
फोटोवर लोकांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया
बंगळुरूमधील हायवेवरचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो बंगळुरूमधील हायवेवरचा असल्याचं सांगण्यात आले आहे. हायवेवर वाहने भरधाव वेगाने जात असताना एक व्यक्ती मात्र आपल्या बाईकवर बसून चक्क लॅपटॉपवर काम करताना दिसतोय. या फोटोवरून लोक वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया शेअऱ करताना दिसून येत आहे.
हेही वाचा:पावसाळी अधिवेशनातील हे मजेशीर फोटो तुम्ही पाहीलेत का?
रस्त्यावर सतर्क राहण्याची गरज
काही लोक या फोटोवरून त्या व्यक्तीच्या बॉसला दोष देत आहेत, तर काही लोकांचा असा विश्वास आहे की ती व्यक्ती स्वतःचे काही काम करत असावी. सर्वांनी याला धोकादायक म्हटले असले तरी रस्त्यावर बाईक चालवताना एक छोटीशी चूक सुद्धा आयुष्य खराब करू शकते. त्यामुळे रस्त्यावर सतर्क राहण्याची गरज आहे.
हेही वाचा:आमदार जोशुआ यांची मुरगाव पीडीएवर नियुक्ती…