फटाक्यांवरील न्यायालयाच्या आदेशाचं केलं जातंय उल्लंघनः सर्वोच्च न्यायालय

विवाह, सण आणि विजयाच्या मिरवणुकांमध्ये फटाक्यांचा निर्विकारपणे वापर केला जात असल्याचं निरिक्षण नोंदवलं

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्ली: देशातील फटाक्यांच्या वापरामध्ये नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी चिंता व्यक्त केली. विवाह, सण आणि विजयाच्या मिरवणुकांमध्ये फटाक्यांचा निर्विकारपणे वापर केला जात असल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे.

न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन

हजारो आणि हजारो फटाक्यांच्या माळ पेटवल्या जात आहेत. ज्यांच्यावर न्यायालयाच्या आदेशांचे पालन करण्याची जबाबदारी आहे, ते त्याचं उल्लंघनही करत आहेत. यासंदर्भात प्रशासनाची जबाबदारी निश्चित करावी लागेल, असं न्यायालयाने म्हटलं आहे.

२०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने इकोफ्रेंडली फटाक्यांच्या निर्मितीचे दिले होते आदेश

२०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने कमी प्रदूषण करणार्‍या इकोफ्रेंडली फटाक्यांची निर्मिती आणि विक्री करण्याचे आदेश दिले होते. सध्या प्रामुख्याने न्यायालयात दोन अर्जांवर सुनावणी सुरू आहे. एक अर्ज प्रकरणाच्या मूळ याचिकाकर्त्यांचा आहे. यामध्ये प्रदूषणमुक्त फटाके तयार करण्यात आलेले अपयश लक्षात घेता फटाक्यांवर पूर्ण बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. दुसरा अर्ज फटाका बनवणाऱ्यांकडून आहे. लाखो कामगार बेरोजगार झाल्याचे त्यांनी नमूद केले आहे. त्यांनी पेट्रोलियम आणि एक्सप्लोझिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशनला (पीईएसओ) फटाक्यांना मंजुरी देण्याच्या अर्जावर लवकर निर्णय घेण्याची मागणी न्यायालयाने केली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!