VIDEO VIRAL | नवरीची वरात पोचली पोलिस स्टेशनच्या दारात

स्कॉर्पिओच्या बोनेटवर बसून प्रवास महागात पडला; नववधूवर गुन्हा दाखल

Goan Varta Live | प्रतिनिधी

पुणे: सोशल मीडियाच्या युगात लग्न सोहळ्यांचा ट्रेंड पूर्णतः बदलून गेला आहे. त्यातच आताच्या मुली लग्न मंडपात शानदार एन्ट्री करू लागल्या आहेत. कुणी बुलेटवर, ट्रॅक्टरवर, बैलगाडीत तर कुणी नाचत लग्नमंडपात एन्ट्री केलेली आपण बघितली. मात्र पुण्यातील  एका नवरीला गाडीच्या बोनेटवर बसून प्रवास करणं चांगलंच महागात पडलं आहे. तिच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

हेही वाचाः Video | जीव धोक्यात घातला, पण वीज कर्मचाऱ्यानं कर्तव्य बजावलं!

स्कॉर्पिओच्या बोनेटवर बसून केला प्रवास

भोसरी परिसरातील एका नवरी मुलीने चक्क स्कॉर्पिओच्या बोनेटवर बसून धोकादायकरितीने  दिवे घाटातून मंगल कार्यालयाच्या दिशेने प्रवास केला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. कोरोनाच्या संकटातही विशेष काळजी घेत सध्या अनेक ठिकाणी छोटेखानी विवाहसोहळे पार पडत आहेत. परंतु या नववधूने लग्नासाठी जात असताना उत्साहाच्या भरात दिवे घाटातून चक्क मोटारीच्या बोनेटवर बसून मंगल कार्यालयाच्या दिशेने प्रवास केला. मात्र धोकादायक पद्धतीने अशी स्टंटबाजी करताना नवरी मुलीला आणि तिच्या कुटुंबियाला कायद्याचा विसर पडल्याचे दिसून आलं.

हेही वाचाः ‘दिल्लीत काय चाललंय ते माहीत नसणारे गोव्यात काय करणार?’

व्हिडिओ वायरल, नववधूवर गुन्हा दाखल

सोशल मीडियावर वायरल झालेला हा व्हिडिओ पोलिसांपर्यंत पोहोचला. त्यानंतर स्कॉर्पिओच्या बोनेटवर बसून मंगल कार्यालय गाठणाऱ्या नववधूवर लग्नाच्या पहिल्याच दिवशी पुण्यातील लोणी काळभोर पोलीस स्टेशनममध्ये गुन्हा दाखल झाला आहे. नवरी मुलीसोबत तिच्या कुटुंबियांवरही गुन्हा दाखल झाला आहे. 

योग्य-अयोग्य यातील फरक ओळखणं गरजेचं

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमुळे अनेकजण रातोरात स्टार झाले. एका व्हिडीओ अथवा फोटोमुळे काहींना प्रसिद्धी मिळाली. त्यामुळेच आपल्यालाही प्रसिद्धी मिळावी यासाठी काहीजण कोणत्याही थराला जातात. मात्र असं करत असतात योग्य आणि अयोग्य यातील फरक ओळखणे गरजेचं असतं. अन्यथा प्रसिद्धी मिळते पण हवीहवीशी नाही तर नकोशी वाटणारी.  

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!