Video | …म्हणून क्राईम ब्रांचने शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक केली!

सोमवारी रात्री करण्यात आली अटक

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

मुंबई : राज कुंद्रा यांच्या अटकेच्या वृत्तानं संपूर्ण बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा राज कुंद्रा यांना अटक केली आहे. पॉर्नफिल्म प्रकरणी त्यांना ही अटक करण्यात आल्याचं समोर आलंय. ८ तास राज कुंद्रा यांची पोलिसांनी कसून चौकशी केली होती. या चौकशीनंतरच त्यांना अटक करण्यात आली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा आणि प्रसिद्ध उद्योगपती म्हणून राज कुंद्रा ओळखले जातात. सोमवारी रात्री मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) क्राईम ब्रांचने त्यांना अटक केली. राज कुंद्रा (Raj kundra) यांना आधी पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते. चौकशी झाल्यानंतर त्यांना अटक (Raj Kundra Arrested) करण्यात आली आहे. पॉर्न फिल्म रॅकेट प्रकरणी (Porn film Racket) त्यांना अटक करण्यात आली.

हेही वाचा : सभागृहात बसून पॉर्न कंटेट स्क्रोल करताना राजकीय नेता कॅमेऱ्यात कैद

पॉर्न चित्रपटांच्या चित्रिकरणाप्रकरणी राज कुंद्रा यांना सोमवारी सकाळी मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने (Mumbai police Crime Branch) चौकशीसाठी बोलावलं. दिवसभर त्यांची चौकशी केली. या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली. या प्रकरणी फेब्रुवारी 2021 रोजी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीवरुन राज कुंद्रा यांच्याविरोधात पॉर्न चित्रपट (Porn Film) तयार करणे आणि काही अॅप्सवर ते दाखवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. पॉर्न चित्रपट तयार करणाऱ्या अनेकांची मुंबई पोलिसांकडून चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर सोमवारी राज कुंद्रा यांची चौकशी करण्यात आली. तब्बल 8 तासांच्या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली. दरम्यान, आता राज कुंद्रा यांच्या अटकेनंतर या प्रकरणाशी संबंधित आणखीही काही जणांना अटक केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे रॅकेट किती मोठं आहे, याची कल्पनाच केलेली बरी.

हेही वाचा : सिंगल स्क्रीनवरुन फोन स्क्रीनवर कशी आली ऍडल्ट फिल्म?

शिल्पा शेट्टी कनेक्शन काय?

राज कुंद्रा यांच्याविरोधात पुरेसे पुरावे असल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली असल्याचं बोललं जातंय. बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेटी यांचे पती असल्याकारणानं राज कुंद्रा अटक ही आणखीनंच चर्चिला जाणार, यात शंका नाही. आज त्यांना कोर्टात (Court) हजर केलं जाणार आहे. दरम्यान, शिल्पा शेट्टीने राज कुंद्रा (Shilpa Shetty and Raj kundra Marriage) यांच्यासोबत 22 नोव्हेंबर 2009 मध्ये लग्न केलं. राज कुंद्रा यांचं हे दुसरे लग्न आहे. त्यांनी आधीच्या पत्नीला घटस्फोट दिला आहे. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांना दोन मुलं आहेत.

पहिल्या पत्नी का दिला घटस्फोट?

ई-टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत राज कुंद्राने पहिली पत्नी कविताला घटस्फोट का दिला, याबाबत धक्कादायक खुलासा केला होता. राज कुंद्रा याने म्हटलं होतं की…

‘अनेक वर्षांनंतर आता या मुद्द्यावर बोलल्यानंतर मला आता ठीक वाटत आहे. कारण मी आज सत्य बोलू शकलो आहे. आता कविता यावर काय प्रतिक्रिया देईल याने मला काहीच फरक पडत नाही. माझ्या आईनेच कविता आणि माझ्या बहिणीचा पती वंश यांना अनेकदा नको त्या अवस्थेत पाहिलं होतं. यात दोन कुटुंबं उध्वस्त होत होती पण त्यांनी थोडाही विचार केला नाही. ‘मी कधीच कविताशी बोललो नाही आणि मला यापुढे कधीच तिच्याशी बोलायचंही नाही.’

हेही वाचा : पंचनामा | पूनम पांडे, पॉर्नोग्राफी आणि आपला गोवा

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!