VIDEO | पादचाऱ्याचा निष्काळजीपणा नडला; भरधाव वेगात आलेल्या दुचाकीने उडवलं

हैदराबादमधील घटना; अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद; पादचारी-चालक जखमी; उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये केलं दाखल

Goan Varta Live | प्रतिनिधी

हैदराबादः हैदराबादच्या मेडचल येथे एक भायानक अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. रविवारी दुपारी मोटारसायकल चालक आणि एक पादचारी यांच्यात जोराची टक्कर झालीये. यात दोघेही जखमी झाले असून त्यांना तत्काळ जवळच्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलंय. ही घटना जेडीमेतला पोलिस हद्दीतील चिंतल बस स्टॉपजवळ घडली.

हेही वाचाः VIDEO VIRAL | कमालाच केली या पोराने!

पादचाऱ्याला दिली धडक

पोलिसांच्या माहितीनुसार चिंतल येथील रहिवासी असलेले शिवा साई गौड दुचाकीवरून बालानगरच्या दिशेने जात होते. बस स्टॉपवर पोहोचताच त्याने एका पादचाऱ्याला धडक दिली आणि तो जवळजवळ एका कारच्या दोन्ही चाकांच्या मध्यभागी गेला. पादचाऱ्याचा निष्काळजीपणा आणि चालकाचा भरधाव वेग या अपघातासाठी कारणीभूत ठरलेत.

हेही वाचाः CURFEW | कर्फ्यू अजून काही दिवस वाढणार?

चालक-पादचारी जखमी

मोटारचालक वेगात होता आणि त्याने हेल्मेट घातलं नव्हतं, तर पादचारी रहदारीकडे लक्ष न देता मोबाईलमध्ये बघत रस्ता ओलांडत होता. शंकरय्या असे पादचाऱ्याचे नाव असून त्याला किरकोळ दुखापत झाली आहे, तर शिवा साई गौड या पदवीधर विद्यार्थ्याच्या डोक्याला मोठी दुखापत झाली असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतंय.

अपघात कॅमेऱ्यात झाला रेकॉर्ड

रस्त्याच्या कडेला असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना रेकॉर्ड झाली. जेडीमेतला पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. जेडीमेतला पोलिसांनी सांगितलं की, दोघांचा निष्काळजीपणा या अपघातासाठी कारणीभूत असल्याने दोघांवर कारवाई करण्यासाठी त्यांच्यावर वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पादचारी दोन्ही बाजू न पाहता मोबाईलमध्ये बघत रस्ता क्रॉस करत होता, तर मोटारचालकाने हेल्मेट घातलं नव्हतं आणि तो जास्त वेगाने जात होता.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!