VIRAL VIDEO | लखनऊनंतर ‘पानिपत गर्ल’चा कारनामा

कारचालकाला भररस्त्यात मारहाण, व्हिडीओ व्हायरल

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट: उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे भररस्त्यात एका तरुणीने कॅब ड्रायव्हरला मारहाण केल्यानंतर देशभरात खळबळ उडाली होती. मारहाणीचा व्हिडीओ पाहून लोक तरुणीवर कडक कारवाई करावी अशी मागणी करत होते. या प्रकारानंतर आता अशीच दुसरी एक घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. हा व्हिडिओ पानिपतचा असून यामध्ये एक महिला कारचालकाला शिवीगाळ करत असून त्याला मारत आहे.

हेही वाचाः Tokyo 2021 : अभिमानास्पद! रस्त्यावर कचरा गोळा करणारा जेव्हा ऑलिम्पक मेडल जिंकतो…

पानिपतमध्ये महिलाची कारचालका मारहाण

मागील काही दिवसांपासून लखनऊ येथील तरुणीच्या व्हिडीओमुळे सोशल मीडियावरील वातावरण तापलेलं आहे. या तरुणीवर कडक कारवाई केली जावी अशी मागणी केली जात आहे. त्यानंतर आता पानिपत येथील दुसऱ्या एका महिलेने असाच एक कारनामा केला आहे. ही महिला एका कारचालकाला भर रस्त्यात मारहाण करत आहेत. व्हिडीओमध्ये दिसतं त्याप्रमाणे एका महिलेने आपल्या चेहऱ्याला स्कार्फ बांधलेला आहे. स्कार्फ बांधलेल्या या महिलेने कारचालकाला अडवले आहे. ही महिला कारचालकाशी हुज्जत घालत आहे. तसेच या महिलेने कारचालकाला मारहाणदेखील केली आहे. महिलेच्या या धिंगाण्यामुळे रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा झाला आहे.

हेही वाचाः BREAKING| नीरज चोप्राने सोनं लुटलं, भालाफेकीत भारताला सुवर्ण

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान हा प्रकार घडल्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. नेटकरी या तरुणीवरदेखील कडक कारवाई केली जावी अशी मागणी करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार कारचालकाला मारहाण करतानाचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल केला आहे. पीडित तरुणांवर उपचार करण्यात आला आहे. पीडित युवकांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करुन योग्य ती कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

हा व्हिडिओ पहाः Video | 24X7 FREE INTERNET | 2 तास नव्हे, जीत देणार 24 तास मोफत वायफाय

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!