Video | जय हो! बिटिंग रिट्रीटचा थरार प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा अशी परेड
Goan Varta Live | प्रतिनिधी
दिल्लीच्या विजय चौकात बीटिंग रिट्रीट सोहळा दिमाखात पार पडला. यावेळचा बीटिंग रिट्रीट कार्यक्रम खूप खास होता. यावेळी बीट-रिट्रीट सोहळ्याची सुरुवात १९७१ च्या युद्धातील पाकिस्तानवरील विजयासाठी तयार करण्यात आलेल्या विशेष धूनने करण्यात आली. या ट्यूनला ‘स्वर्णिम विजय’ थीम असे नाव देण्यात आले आहे.
१९७१च्या पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात भारताच्या विजयाला ५० वर्ष पूर्ण होत आहेत. या वेळी समारंभात १५ सैन्य बँड आणि रेजिमेंटल सेंटर आणि बटालियनचे ड्रम बँड मोठ्या संख्येने उपस्थित होते. ऐतिहासिक विजय चौकात 26 हून अधिक म्युझिकल शो प्रेक्षकांना रोमांचित करत आहेत. सारे जहां से अच्छा च्या नादात कार्यक्रमाची सांगता झाली. याशिवाय नेव्ही, एअरफोर्स आणि सशस्त्र पोलिस दलातील प्रत्येक बँडही यात सहभागी झाले होते. कोरोना प्रोटोकॉलमुळे, या वेळी केवळ 5000 लोक या कार्यक्रमात सहभागी करण्यात आलं होतं.
बिटिंग रिट्रिट सोहळा 2021