VIDEO | ट्रॅफिक हवालदाराच्या कानशिलात लगावणारी अटकेत, या कारणावरुन झाला राडा

मुंबई पोलिसांच्या बदनामीसाठी पुन्हा कट रचला गेला की काय

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

मुंबई : मुंबई पोलिस सुशांत सिंह आत्महत्याप्रकरणापासून चर्चेत आहेत. त्यांच्या बदनामीचा कट रचल्याचा सूर पुन्हा एकदा उमटू लागलाय. त्याला कारणीभूत ठरली आहे, मुंबईच्या काळबादेवीत घडलेली घटना. दिवसभर या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल (mumbai police beaten) झाला होता.
या घटनेवरुन अनेक तर्कही लढवले जात होते. मात्र नेमकं काय घडलं, हे तेव्हा कुणालाही माहीत नव्हतं.

नेमकं काय घडलं

एकनाथ पार्टे हे वाहतूक पोलिस हवालदार काळबादेवीत ऑन ड्यूटी होते. दुचाकीवरुन जात असलेल्या एका दाम्पत्याला त्यांनी अडवलं. दुचाकीस्वारानं हेल्मेट न घातल्यानं त्यांनी त्याला अडवलं. त्यानंतर दोघांमध्ये बाचाबाची झाली. ही बाचाबाची टोकाला गेली. इतकी की त्याचं रुपांतर हाणामारीत झालं. त्यानंतर महिलेनं वाहतूक पोलिस हवालदारावर गंभीर आरोप करत त्याच्या कानशिलात लगावली. अश्लील भाषेत त्यांची कॉलर धरुन त्यांना मारहाण केली.

राडा होतोय, हे पाहून बघे जमले. खिशातून मोबाईल निघाले. आणि व्हिडीओ रेकॉर्ड करु लागले. पोलिस पळ काढतोङ्य, हे पाहून महिला त्याच्या मागेमागे मारत जाऊ लागली. त्यानंतर आलेल्या लेडीज कॉन्स्टेबलनं मारहाण करणाऱ्या महिलेला धरलं. आणि त्यानंतर काय झालं माहीत नाही. पण व्हिडीओ संपला. खाली तो व्हिडीओ आम्ही देत आहोत. त्यातील भाषा अश्लील आहे, त्यामुळे शक्यतो आवाज ऐकू नये, ही विनंती.

कारवाईची मागणी

किरीट सोमय्या आणि संजय राऊतांचे व्हिडीओवर ट्वीट पडले. कारवाईची मागणी करण्यात आली. तातडीनं मुंबई पोलिसांनी तपासाची सूत्र हलवली.
वाहतूक पोलिसाला मारहाण करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. व्हिडीओ काढणाऱ्या एकालाही ताब्यात घेण्यात आल्याचं कळतंय. मारहाण करणाऱ्या महिलेचं वय 29 वर्ष असून तिचं नाव सागरीका तिवारी असल्याचं सांगितलं जातं. तर ज्यानं हेल्मेट घातलं नव्हतं, त्याचं नाव मोहसीन शेख असून त्याचं वय 32 वर्ष आहे.

सोशल मीडियात चर्चा

या घटनेमुळे पुन्हा एकदा मुंबई पोलिसांच्या किंबहुना वर्दीवर हात उचलणाऱ्यांविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटल्यात. हे दोघेही परप्रांतीय असल्याची टीका करण्यात आली असून त्यांना आपल्या राज्यात परत पाठवा, असाही सूर उमटू लागलाय. मुळात या घटनेकडे आणखी एका नजरेतून पाहिलं जातंय. मुंबई पोलिसांची पुन्हा एकदा बदनामी करण्यासाठी हा प्रकार जाणीवपूर्वक करण्यात आलाय की काय, असाही एक तर्क लावला जातो.. या सर्व तर्क-वितर्कांमध्ये एक गोष्टी तुफान वायरल झाली. ती म्हणजे या राड्याचा व्हिडीओ. नसेल पाहिला तर पाहुन घ्या…

पाहा सविस्तर रिपोर्ट –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!