Video | मोदींच्या डोळ्यात पाणी… निमित्त काँग्रेस खासदारांचा निरोप

राज्यसभेत बोलताना पंतप्रधानांना अश्रू अनावर

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्ली : राज्यसभेतील काँग्रेसच्या चार सदस्यांचा कार्यकाळ संपतोय. चारही सदस्य जम्मू काश्मिरचे आहेत. या सदस्यांना सभागृहात निरोप देतेवेळी मोदींनी भाषण केलं. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींना गहिवरुन आलं होतं. त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. गुलाम नबी आझादांचं कौतुक मोदींनी केलं. यावेळी त्यांच्याविषयी बोलताना मोदींच्या भावना दाटून आल्या होत्या. दहशतवादी हल्ल्यानंतर आझाद यांच्याबद्दलचा अनुभव मोदींनी राज्यसभेत सांगितला. त्यावेळी मोदींना राहावलं नाही, आणि त्यांचे डोळे पाणावले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले,

“जेव्हा गुजरातमधील यात्रेकरूंवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यावेळी मला गुलाम नबी यांचा सर्वात आधी फोन आला होता. त्यावेळी तो फोन फक्त माहिती देण्यासाठी नव्हता. त्यांचे अश्रू थांबत नव्हते. त्यानंतर मी तत्कालिन संरक्षणमंत्री प्रणव मुखर्जी यांना फोन केला. त्यांना मृतदेह आणण्यासाठी विमान उपलब्ध करून देण्याची मागणी केली. त्यांनी व्यवस्था करतो असं सांगितलं. त्यानंतर रात्रीही ते विमानतळावर होते. गुलाम नबी यांनी विमानतळावरून पुन्हा कॉल केला. त्यावेळी एखादा माणूस जसा कुटुंबातील व्यक्तीची चिंता करतो, तशीच चिंता ते करत होते. पद, सत्ता जीवनात येत-जात राहते. ती सांभाळता आली पाहिजे. माझ्यासाठी तो फार भावूक क्षण होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी पुन्हा फोन केला आणि विचारलं सगळे लोक पोहोचलेत ना? त्यामुळे मी त्यांच्याविषयी माझ्या मनात आदर आहे”

पाहा व्हिडीओ –

पाहा ट्विटरवर –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!