VIRAL VIDEO : अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी दुकानदाराच्या कानाखाली वाजवली!

Goan Varta Live | प्रतिनिधी
ब्युरो रिपोर्ट: छत्तीसगडमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी औषध आणायला जाणाऱ्या एकाला कानशिलात लगावल्याच्या घटनेला दोन दिवस होत नाहीत तोच असाच एक प्रकार मध्य प्रदेशात पाहायला मिळालाय. मध्य प्रदेशच्या शहाजापूरमध्ये अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी एका चप्पल दुकानदाराच्या कानाखाली वाजवल्याचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. लॉकडाऊनच्या काळातही दुकान उघडं ठेवल्यामुळे त्या दुकानदाराला मारहाण झाल्याचं बोललं जात आहे. मंजुषा विक्रांत राय असं या अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांचं नाव आहे.
खोटं बोलला म्हणून लगावली कानाखाली
लॉकडाऊनच्या काळात फक्त अत्यावश्यक सेवेची दुकाने सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, शहाजापूरमधील एका चप्पल विक्रेत्यानं दुकान सुरु ठेवल्याचं मंजुषा राय यांच्या लक्षात आलं. त्यांनी संबंधित दुकानदाराला त्याबाबत चांगलंच खडसावलं. तसंच त्याच्या घराचा पत्ता विचारला. त्यावेळी तो दुकानदार खोटं बोलत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. तेव्हा मंजुषा राय यांनी दुकानदाराच्या कानाखाली मारली. तेव्हा अन्य एका पोलिसाने दुकानदाराला दांडक्याचा धाक दाखवला. शेवटी अधिकाऱ्यांनी त्या दुकानदाराला दुकान बंद करण्याची तंबी दिली आणि तिथून निघून गेले.
MP: In a viral video, Shahajpur ADM was seen slapping a footwear shopkeeper, during the sealing of shops as a part of following #COVID19 lockdown guidelines
— ANI (@ANI) May 24, 2021
Shopkeeper says, "The shutter was down, still Policemen pulled it up. ADM slapped me & Policeman even hit me with stick." pic.twitter.com/r1twTEn4nt
कलेक्टरनं आधी मोबाईल फोडला नंतर थोबाडीत मारली
छत्तीसगडच्या सुरजापूरचे कलेक्टर रणबीर शर्मा यांनी एका व्यक्तीला विनाकारण केलेली मारहाण सध्या चर्चेचा विषय आहे. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हीडिओत सूरजापूरचे जिल्हाधिकारी एका व्यक्तीवर दादागिरी करताना दिसत आहेत. या व्यक्ती त्यांच्याकडे गयावया करत असताना त्यांनी प्रथम त्या व्यक्तीला मोबाईल जमिनीवर आटपून फोडला. त्यानंतर या व्यक्तीने जाब विचारला तेव्हा कलेक्टरने या व्यक्तीच्या कानाखाली मारली. एवढंच नव्हे तर आजुबाजूला असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनाही त्याने व्यक्तीला झोडून काढा, असं सांगितले. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत. अनेकजण कलेक्टरने गेलेल्या अधिकारांच्या गैरवापराविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.
This is how people like @RanbirSharmaIAS are defaming entire IAS fraternity.
— Chota Don (@choga_don) May 22, 2021
Shame that he has passed India's Top Civil Services Exam and misusing his power.pic.twitter.com/QfyP0BTIXI
कलेक्टरनं लग्नात घुसून वऱ्हाडींची वरात काढली
त्रिपुरातील आगरताळामध्ये नियमांचं उल्लंघन करत होत असलेल्या लग्नात जिल्हाधिकाऱ्यांनी घुसून थेट वर्हाडी मंडळींची वरात काढल्याचं काही दिवसांपूर्वी पाहायला मिळालं होतं. शैलेश यादव असं या जिल्हाधिकारींचं नाव आहे. एकिकडे अनेक रुग्ण आयसीयूत दाखल आहेत, तर दुसरीकडे काही मंगल कार्यालय चालक जिल्हा प्रशासनाचे नियम धाब्यावर बसवून मनमानी पद्धतीने लग्न समारंभ करत असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आलं. यानंतर त्यांनी पोलिसांना कारवाई करण्यास सांगितलं. मात्र, पोलीसही टाळाटाळ करत असल्याचं आणि उडवाउडवीची उत्तर देत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे नियमांचं उल्लंघन करत होत असलेल्या लग्नांना पोलिसांकडूनही अभय असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे एकूणच नागरिक आणि पोलिसांचं बेजबाबदार वर्तन पाहून जिल्हाधिकारी शैलेश यादव चांगलेच संतापलेले पाहायला मिळाले.
जगावर कोरोनाचं संकट आलंय, भारतात थैमान सुरुय, हजारो लोकांनी जीव गमावलाय, तरीही पैशांच्या जीवावर नियम धाब्यावर बसवून आपले लाड पूर्ण करणाऱ्यांवर त्रिपुरातील आगरताळा येथे जिल्हाधिकाऱ्यांनी केलेली कारवाई.#Tripura #Agartala #Lockdown #CoronaEffect pic.twitter.com/UtF07i11f7
— Pravin Sindhu 🇮🇳✊ (@PravinSindhu) April 27, 2021