Vice President of India : जगदीप धनखड बनले देशाचे १४ वे उपराष्ट्रपती…

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली पद आणि गोपनियतेची शपथ

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट : पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल जगदीप धनखड यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज भारताचे १४ वे उपराष्ट्रपती म्हणून शपथ दिली. दिल्लीतील राष्ट्रपती भवनात हा शपथविधी सोहळा पार पडला. या शपथविधी सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह विविध पक्षातील नेते उपस्थित होते.
हेही वाचा:Photo Story | सोहळा लोकशाहीचा, जागर मताधिकाराचा, पहा पंचायत निवडणूक मतदानातील ‘खास फोटो’…

१७२ मते जास्त मिळवत धनखड विजयी

उपराष्ट्रपती पदाच्या ६ तारखेला झालेल्या निवडणुकीत, राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार असलेल्या धनखड यांनी विरोधी पक्षाच्या मार्गारेट अल्वा यांचा ५२८ विरुद्ध १८२ मतांच्या मोठ्या फरकानं पराभव केला होता. बहुमतापेक्षा १७२ मते जास्त मिळवत धनखड यांनी या निवडणुकीत विजय मिळवला.
हेही वाचा:Panchayat Election | कळंगुट प्रभाग ९ मध्ये आज मतदान, कारण…

शपथविधीआधी केले ट्वीट

शपथविधीआधी धनखड यांनी दिल्लीतील राजघाटावरील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळी आदरांजली वाहिली. “राजघाटावरील निर्मळ आणि शांत वातावरणात पूज्य बापुंचा आशिर्वाद घेतल्यानंतर धन्य वाटले” अशी भावना या भेटीनंतर धनखड यांनी व्यक्त केली. या भेटीचा व्हिडीओ त्यांनी ट्वीट केला आहे.
हेही वाचा:मतदान करून परतताना दाम्पत्यावर ‘काळाचा घाला’…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!