आली रे आली, अखेर भारतीय बनावटीची लस आली! DCGIने घेतला महत्त्वाचा निर्णय

शनिवारी पार पडलं होतं लसीकरणाचं ड्रायरन

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारतीय बनावटीच्या लसींना अखेर मंजुरी देण्यात आली आहे. CDSCOच्या तज्ज्ञांच्या समितीनं भारत बायोटेकच्या कोवॅक्सिला एमर्जन्सी युझसाठी परवानगी दिली होती. त्यानंतर DCGI याबाबत अंतिम निर्णय काय घेतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. अखेर डीसीजीआयनंही या लसींना मंजुरी दिली आहे.

आपात्कालीन वापरासाठी मंजुरी

भारतात कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींना परवानगी देण्यात आली आहे. आपात्कालीन वापराची या लसींना परवानगी देण्यात आल्याचं डीसीजीआयनं म्हटलंय. त्यामुळे लसीकरणाच्या प्रक्रियेतला सर्वात मोठा टप्पा पार पडल्याची भावना व्यक्त केली जाते आहे. सीरम आणि ऑक्सफोर्डने तयार केलेल्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींना संमती देण्यात आली आहे. डीसीजीआयने पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.

भारतात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर झाला होता. त्यानंतर चर्चा सुरु झाली ती लसीकरणाच्या मोहिमेची. शनिवारी ड्राय रनही पार पडला होता. त्यानंतर प्रतीक्षा होती ती आपात्कालीन वापरासाठी दोन्ही लसींना संमती मिळते की नाही याची! दरम्यान दोन्ही लसींना संमती देण्यात आली आहे. लसीकरणाच्या मोहिमेतलं हे एक महत्त्वाचं पाऊल आहे.

दरम्यान करोनाची लस घेतल्यामुळे नपुंसकत्व येतं असा आरोप समाजवादी पक्षाचे नेते आशुतोष सिन्हा यांनी केला आहे. याबाबत डीसीजीआयचे व्ही. जी. सोमानी यांना विचारणा करण्यात आली. त्यानंतर त्यांनी म्हटलंय की..

आम्ही कधीही अशा लसीला संमती देणार नाही जी नपुंसकत्व आणते. या दोन्ही लसी १०० टक्के सुरक्षित आहेत. लस घेतल्याने पुरुषांना नपुंसकत्व येतं असं म्हणणं साफ चुकीचं आहे. अशा मूर्खपणाच्या वक्तव्यांकडे लक्ष देऊ नये.

पाहा व्हिडीओ –

पंतप्रधान म्हणाले की…

डीसीजीआयने घेतलेल्या निर्णयमुळे कोरोनाविरुद्धची लढाई आपण अधिक सक्षमपणे आणि खंबीरपणे लढण्यास मदत होणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. त्यांनी सर्वांचं अभिनंदनही केलंय.

जागतिक आरोग्य संघटनेनंही केलं निर्णयाचं स्वागत

भारतानं घेतलेल्या निर्णयचा स्वागत करत असल्याचं ट्वीट whoनं केलं आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!