देशात बुधवारी २५ लाख २८ हजार लाभार्थ्यांचं लसीकरण पूर्ण

आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या २३ कोटी ८८ लाखाहून जास्त मात्रा

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः देशात आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या २३ कोटी ८८ लाखाहून जास्त मात्रा देण्यात आल्या असल्याचं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे.

हेही वाचाः प्रधानमंत्री नागरी आवास योजनेंतर्गत ७०८ प्रस्तावांना केंद्रसरकारची मंजुरी

५८ हजार पहिल्या, २ लाख ९० हजारांहून जास्त दुसऱ्या मात्रेच्या रुपात

बुधवारी दिवसभरात २५ लाख २८ हजारांहून जास्त लसीच्या मात्रा देण्यात आल्या. यापैकी २२ लाख ५८ हजार मात्रा पहिल्या मात्रेच्या रुपात, तर २ लाख ९० हजारांहून जास्त दुसऱ्या मात्रेच्या रुपात देण्यात आल्या. बुधवारी दिवसभरात १८ ते ४४ वयोगटातल्या १३ लाख ३२ हजार जणांना लसीची पहिली मात्रा तर ७६ हजारांहून जास्त जणांना लसीची दुसरी मात्रा देण्यात आली.

बुधवारी 20 लाख कोरोना चाचण्या

आज देशात सलग 28व्या दिवशी कोरोना व्हायरसच्या नव्या रुग्णांहून कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा अधिक आहे. 9 जूनपर्यंत देशभरात 24 कोटी 27 लाख 26 हजार कोरोना लसींचे डोस देण्यात आल्या आहेत. आतापर्यंत 37 कोटी 21 लाख कोरोना टेस्ट करण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात 20 लाख कोरोना सॅम्पल टेस्ट करण्यात आल्या आहेत. ज्याचा पॉझिटिव्हिटी रेट 4 टक्क्यांहून अधिक आहे. 

हेही वाचाः ‘येस’ बँकेच्या ‘एफडी’च्या व्याजदरात बदल

देशात कोरोना मृत्यूदर 1.22 टक्के

देशात कोरोनाचा मृत्यूदर 1.22 टक्के आहे. तर रिकव्हरी रेट 94 टक्क्यांहून अधिक आहे. सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट होऊन 5 टक्क्यांच्या कमी झाली आहे. कोरोना सक्रिय रुग्णांच्या संख्येत भारत दुसऱ्या स्थानी आहे. तर एकूण बाधितांच्या संख्येतही भारत दुसऱ्या स्थानी आहे. तर जगात अमेरिका, ब्राझीलनंतर सर्वाधित मृत्यू भारतात झाले आहेत. 

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!