आरोपीच्या ऑडी कारमधून प्रवास करणं न्यायाधिशाच्या आलं अंगलट

उत्तराखंड हायकोर्टानं केलं निलंबित

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

देहरादून : आरोपी आणि न्यायालयीन व्यवस्थेतील वरिष्ठांचे संबंध आपण चित्रपटात बघितले असतील. पण अशी घटना उत्तराखंडमध्ये घडल्याचं बघायला मिळालं. आरोपीच्या ऑडी कारमधून प्रवास करणं एका जिल्हा न्यायाधिशाच्या अंगलट आलंय.

देहरादूनचे जिल्हा न्यायाधीश प्रशांत जोशी यांनी एका आरोपीच्या ऑडी कारमधून मसुरी इथं प्रवास केल्याचं निष्पन्न झाल्यानंतर खळबळ उडाली. याची दखल घेत उत्तराखंड हायकोर्टानं जोशी यांना निलंबित केलं. हायकोर्टाचे निबंधक जनरल हिरासिंह बोनाल यांनी ही कारवाई केली. केवल कृष्ण सोनी या आरोपीच्या ऑडी कारमधून जोशी यांनी मसुरीपर्यंत प्रवास केला. राजपूर ठाण्यात सोनी याच्याविरुद्ध एफआयआर नोंद केला आहे. फसवणुकीच्या अनेक प्रकरणांत त्याच्यावर आरोप झाले आहेत. या संदर्भात त्याच्याविरुद्ध एक रिट याचिका विचाराधीन आहे.

निलंबित न्यायाधीश प्रशांत जोशी सध्या रुद्रप्रयाग इथे असून त्यांनी हायकोर्टाच्या परवानगीशिवाय तेथून जाउ नये, असे आदेश देण्यात आलेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!