धक्कादायक खुलासा! राज कुंद्राच्या सीक्रेट कीपरची पत्नी हर्षिता 20 महिन्यांत लक्षाधीश झाली

केवळ 20 महिन्यांत हर्षिताचं बँक खातं लक्षाधीशांमधून करोडपती झालं

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः पोर्नोग्राफी प्रकरणात अडकलेला अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याचं कानपूर कनेक्शन पूर्णपणे स्पष्ट झालं आहे. शहरातील श्यामनगरमध्ये राहणार्‍या अरविंदकुमार श्रीवास्तव याची पत्नी हर्षिता श्रीवास्तव हिच्या खात्यात कुंद्रा कंपनी फ्लिज मूव्हीजच्या कमाईचा भाग थेट येत होता. अरविंद हा राज कुंद्राच्या सीक्रेट कीपर्सपैकी एक आहे. हेच कारण आहे की केवळ 20 महिन्यांत हर्षिताचं बँक खातं लक्षाधीशांमधून करोडपती झालं आहे.

हर्षिताचं माहेर एमआयजी, ब्लॉक ए बर्रा -8 मध्ये आहे. पंजाब नॅशनल बँकेत तिचं चालू खातं वर्ष 2002 मध्ये तिच्या आईच्या नावे असायचं. 10 जानेवारी, 2008 मध्ये हर्षिता आणि तिच्या आईच्या नावाने ते एक संयुक्त खातं बनलं. त्यावेळी त्यांच्या खात्यात फक्त 20 हजार रुपये होते. मे 2019 ते फेब्रुवारी 2021 दरम्यान दोन कोटींपेक्षा जास्त रुपये त्यांच्या खात्यात जमा झाले. 17 मे, 2019 रोजी प्रथमच फ्लिज मूव्हीज ओपीसी प्रायव्हेट लिमिटेडच्या खात्यातून हर्षिताच्या खात्यावर 40 हजार रुपये जमा झाले. 15 जून रोजी 60 हजार, 13 ऑगस्ट रोजी 90 हजार रुपये पाठवण्यात आले. अशाप्रकारे, सन 2019 मध्ये, आठ महिन्यांत, नऊ व्यवहारांच्या माध्यमातून, 8.14 लाख रुपये खात्यात जमा झाले. सन् 2019 च्या शेवटचे देयक 31 डिसेंबर रोजी 2 लाख रुपयांवर देण्यात आलं होतं. 14 लाख खात्यात जमा केले. वर्ष 2019 साठी शेवटचे देयक 31 डिसेंबर रोजी 2 लाख रुपयांवर देण्यात आलं होतं.

40 दिवसांत पत्नीच्या खात्यावर पाठवले 67 लाख रुपये

२२ ऑक्टोबर २०२० पासून अरविंद स्वत: पत्नीच्या खात्यावर पैसे पाठवू लागले. पहिल्यांदाच चाचणी म्हणून पाच हजार रुपये पाठवले. चार दिवसांनंतर 26 ऑक्टोबर रोजी पाच लाख आणि त्यानंतर 29 ऑक्टोबरला पाच लाख रुपये पाठवण्यात आले. यानंतर 3, 4 आणि 12 नोव्हेंबर रोजी प्रत्येकी पाच लाख रुपये पाठवले. 2020 मध्येच 17 नोव्हेंबरला 20 लाख, 20 नोव्हेंबरला 10 लाख, 24 नोव्हेंबरला पाच लाख, 26 नोव्हेंबरला 10 लाख, 30 नोव्हेंबरला सात लाख, अशाप्रकारे नोव्हेंबर 2020 मध्ये एका महिन्यात अरविंदने हर्षिताच्या खात्यात 67 लाख रुपये ट्रान्सफर केले.

पगाराच्या नावाखाली हर्षिताच्या खात्यात जमा झाले 21.60 लाख

2020 मध्ये केवळ 2 महिनेच फ्लीजकडे रक्कम पाठवली गेली. यानंतर पैसे पाठविण्याची पद्धत बदलली. मार्च, मे आणि जूनमध्ये प्रत्येकी 4 लाख रुपये आणि जुलै आणि ऑगस्टमध्ये 4.80 लाख रुपये दोन वेळा पगारच्या रुपात पोहोचले. अशाप्रकारे 21.60 लाख रुपये पगाराच्या माध्यमातून मिळाल्याचं सांगितलं आहे, तर हर्षिताचं कुटुंबाचं म्हणणं आहे की हर्षिता कुठलाच जॉब करत नाही.

गेल्या दोन महिन्यांत पाठवले 95 लाख

अरविंदने 2021 जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात आपल्या पत्नीच्या खात्यात एकूण 95 लाख रुपये जमा केले. पैकी 1 जानेवारी रोजी 7 लाख, 2 जानेवारी रोजी 15 लाख, 5 जानेवारीला 10 लाख, 1 फेब्रुवारीला 7 लाख, 8 फेब्रुवारीला 13 लाख, 10 फेब्रुवारीला 13 लाख, 11 फेब्रुवारीला 15 लाख रुपये जमा झालेत. अचानक खात्यात पैसे ओव्हरफ्लो झाल्याने गुन्हे शाखेच्या विनंतीवरून बँकेने खात्यातील व्यवहार बंद केले. सध्या या खात्यात दोन कोटी 36 लाख 1 हजार 620 रुपये जमा आहेत.

हर्षिताचे वडील आणि भाऊ सरकारी नोकरीत

हर्षिताचे वडील एचसी कॉर्पोरेशन डीएमएसआरडीमध्ये सरकारी नोकरीत मटेरियल इन्स्पेक्टर होते. 2012 साली त्यांचं निधन झालं. कुटुंबात आई घरीच असते. हर्षिताचा एक भाऊ अलौकिक एलआयसी मुंबईत अधिकारी आहे. आईने सांगितलं की हर्षिताचं 2000 साली लग्न झालं होतं. तिने एम.एस्सीपर्यंत शिक्षण घेतलं आहे. ती कुठेच नोकरी करत नाही. तीन वर्षांपूर्वी ती सिंगापूरहून काही दिवस कानपूरला आली होती. तिने सांगितलं की ती 30-40 वर्षांपासून बर्रा-8 मध्ये रहात आहे. त्यांचा जावई एक अत्यंत सक्षम व्यक्ती आहे. तो काहीही चुकीचं करू शकत नाही, जे काही घडतंय, त्यातलं त्याला काहीच माहीत नाही. 

एकूण 6.50 कोटींचा संशयास्पद व्यवहार

मुंबई क्राइम ब्रँचनुसार अरविंद श्रीवास्तव यांच्या माध्यमातून एकूण 6.50 कोटींचा संशयास्पद व्यवहार करण्यात आला आहे. पैकी सुमारे तीन कोटी रुपये कुटुंबातील सदस्यांना पाठवण्यात आले आहेत. पत्नी आणि वडिलांच्या खात्यात पाठवलेल्या रकमेचा दुवा सापडला आहे, परंतु अन्य खात्यांमध्ये पाठवलेल्या रकमेचा शोध घेण्यात येत आहे.

हर्षिताच्या खात्याची वर्षानुवर्षं असलेली स्थिती

वर्ष 2008 च्या अखेर 56 हजार
वर्ष 2009 च्या अखेर 70 हजार
वर्ष 2010 च्या अखेर 71 हजार
वर्ष 2011 च्या अखेर 73 हजार
वर्ष 2012 च्या अखेर1.61 लाख 
वर्ष 2013 च्या अखेर 59 हजार
वर्ष 2014 च्या अखेर 85 हजार
वर्ष 2015 च्या अखेर 87 हजार
वर्ष 2016 च्या अखेर 1.38 लाख
वर्ष 2017 च्या अखेर 1.47 लाख
वर्ष 2018 च्या अखेर 3 लाख
वर्ष 2019 च्या अखेर 11 लाख
वर्ष 2020 च्या अखेर 1.45 कोटी
फेब्रुवारी 2021 मध्ये 2.33 कोटी

हा व्हिडिओ पहाः Video | Crime | Rape follow up | बलात्कारप्रकरणी चोघांना पोलीस कोठडी

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!