अमेरिकेने अल-कायदाचा म्होरक्या जवाहिरीचा केला खात्मा…

९/११ हल्ल्याचा मास्टरमाइंडचा केला खात्मा

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट : ओसामा बिन लादेनला २०११ मध्ये ठार करण्यात आल्यानंतर अमेरिकेने ड्रोन हल्ला करत अल-कायदाचा म्होरक्या अल जवाहिरीला ठार केलं आहे. मोस्ट वॉण्टेड आणि ९/११ हल्ल्याचा मास्टरमाइंड असणाऱ्या जवाहिरीचा अमेरिकेने ड्रोन हल्ला करत खात्मा केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी जवाहिरीचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
हेही वाचा:‘ग्रेटर पणजी पीडीए’ रद्द : विश्वजीत

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी न्याय मिळाला असल्याची भावना केली व्यक्त

अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जवाहिरीला ठार केल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी, आता न्याय मिळाला असल्याची भावना व्यक्त केली. “कितीही उशीर लागला, तुम्ही कुठेही लपलात तरी, आमच्या लोकांसाठी धोका असाल तर अमेरिका तुम्हाला शोधून बाहेर काढणार,” असा इशारा यानिमित्ताने बायडन यांनी दिला आहे.
हेही वाचा:GOA | मद्यप्राशन करून वाहन चालवाल तर तुरुंगात जाल…

हल्ल्यात ३००० लोकांना गमवावा लागला जीव

जवाहिरीने ९/११ हल्ल्यामध्ये समन्वय साधण्याचं काम केलं होतं. या हल्ल्यात ३००० लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. जवाहिरीच्या डोक्यावर २४ मिलियन डॉलर्सचं बक्षीस ठेवण्यात आलं होतं. या हल्ल्यादरम्यान इतर कोणीही जखमी झालं नसल्याची माहिती बायडन यांनी दिली आहे.
हेही वाचा:WhatsApp Trick | ‘इंटरनेट’ नसतानाही वापरता येणार व्हॉट्सअ‍ॅप, जाणून घ्या जबरदस्त ‘ट्रिक’

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!