महाराष्ट्रात अनलॉकची प्रक्रिया सुरू

जाणून घ्या कोणत्या टप्प्यात काय सुरू आणि काय बंद राहणार!

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः राज्यातल्या करोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने आता लॉकडाउनचे निर्बंध हळूहळू कमी करण्यात येत असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. आज झालेल्या पत्रकारपरिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातल्या बारावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णयही जाहीर केला.

हेही वाचाः टीका उत्सवाच्या श्रेयासाठी काँग्रेस, भाजप कार्यकर्त्यांत बाचाबाची

रुग्ण बाधित 5 टक्क्यांहून कमी असणाऱ्या जिल्हे अनलॉक

राज्यातला लॉकडाउन टप्प्याटप्प्याने हटवण्यात येणार आहे. त्यासाठी रुग्ण बाधित आढळण्याचं प्रमाण 5 टक्क्यांहून कमी असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये सर्वकाही सुरळीत सुरू होणार आहे. मात्र,  इतर जिल्ह्यांमध्ये अंशतः अनलॉक करण्यात येईल. या नव्या नियमांची अंमलबजावणी शुक्रवारपासून करण्यात येणार आहे.

हेही वाचाः आता घरासाठी फक्त महिन्याचा अ‍ॅडव्हान्स द्यावा लागणार

पहिल्या टप्प्यातले जिल्हे

ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ, औरंगाबाद, भंडारा, बुलडाणा, धुळे, गोंदिया, लातूर, नागपूर, नांदेड, चंद्रपूर, नाशिक, परभणी, गडचिरोली, जालना, जळगाव

हेही वाचाः भाजप नेते गौतम गंभीर यांच्या अडचणींत वाढ

काय सुरू होणार?

रेस्टॉरंट्स, मॉल्स

मैदानं, वॉकिंग ट्रॅक्स

खासगी आणि सरकारी कार्यालयं 100 टक्के सुरू

सार्वजनिक कार्यक्रम, लग्न सोहळ्यांना परवानगी

जीम, सलून

आंतरजिल्हा प्रवास

ई-कॉमर्स सुविधा

हेही वाचाः SDG 2021 । देशातील राज्यांत गोवा चौथ्या, तर केरळ पहिल्या स्थानी

दुसऱ्या टप्प्यातले जिल्हेः

मुंबई, मुंबई उपनगर, नंदुरबार, अहमदनगर अमरावती, हिंगोली

हेही वाचाः कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना पाच वर्षं पगार

काय सुरू होणार?

50 टक्के क्षमतेने रेस्टॉरंट्स

59 टक्के क्षमतेने म़ॉल्स, थिएटर्स

सार्वजनिक जागा, मैदानं वॉकिंग ट्रॅक पूर्णपणे सुरू

बांधकामं, कृषीविषयक कामं पूर्णपणे सुरू

जीम, सलून 50 टक्के क्षमतेने सुरू

बसेस पूर्ण क्षमतेने सुरू

जिल्ह्याबाहेर जायला परवानगी, मात्र पाचव्या टप्प्यातल्या जिल्ह्यात जायचं असेल तर पास काढावा लागणार.

हेही वाचाः MONSOON | गोव्यात 5 जूनपूर्वी मान्सून दाखल होण्याची शक्यता

तिसऱ्या टप्प्यातले जिल्हेः

अकोला, बीड, कोल्हापूर, उस्मानाबाद, पालघर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर.

हेही वाचाः गोव्यात विवाहपूर्व समुपदेशनाला भाजपचा विरोध

काय सुरू राहणार?

अत्यावश्यक सेवेतली दुकानं सकाळी 7 ते 2

इतर दुकानं सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते 2 (शनिवार, रविवार बंद)

हेही वाचाः आना फोंत उद्यानाच्या दुरूस्तीचा कृती आराखडा तयार करा

चौथ्या टप्प्यातले जिल्हेः 

पुणे, रायगड

हेही वाचाः राज्यातील कोविड मृत्यूंसाठी सरकारच जबाबदार

चौथ्या टप्प्यातल्या जिल्ह्यांसाठीचे निर्बंध कायम राहतील.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!