गोवा पोलीस उपअधिक्षक एझिल्डा डिसोझा यांना ‘केंद्रीय गृहमंत्री उत्कृष्ट तपास मेडल’ जाहीर

एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनाही पदक; देशातील सुमारे १५२ अधिकाऱ्यांचा होणार सन्मान

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट: उत्कृष्ट तपास आणि शोधकार्यासाठी देण्यात येणारे ‘केंद्रीय गृहमंत्री उत्कृष्ट तपास मेडल’च्या विजेत्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. गोवा पोलीस खात्यातील उपअधिक्षक एझिल्डा डिसोझा आणि एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांना हे मेडल जाहीर झाले आहे. तर देशातील सुमारे १५२ अधिकाऱ्यांचा हे पदक देऊन सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ट्विट करत दिली आहे.

हेही वाचाः भाजप सोडण्याचा प्रश्नच येत नाही; मॉविनची प्रतिक्रिया मी महत्त्वाची मानत नाही

देशातील 28 महिला पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश

गुन्हे तपासातील कौशल्याचा सन्मान व्हावा आणि तपासाचा दर्जा उंचावण्यासाठी या पदकांची सुरुवात करण्यात आली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार हे पदक प्राप्त करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांच्या यादीत देशातील 28 महिला पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. गुन्हेगारी प्रकरणांचा तपासातील उच्च व्यावसायिक मानकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या पदकाची सुरुवात 2018 मध्ये करण्यात आली.

गुन्हेगारी प्रकरणांमध्ये उत्कृष्ट तपास आणि शोधकार्यासाठी पदक

केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार गुन्हेगारी प्रकरणांमध्ये उत्कृष्ट तपास आणि शोधकार्यासाठी केंद्रीय गृह मंत्री पदक 2021 देऊन 152 पोलिस अधिकाऱ्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. हा सन्मान प्राप्त करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांमध्ये सीबीआयचे 15, मध्य प्रदेश तथा महाराष्ट्र पोलिसातील 11-11, उत्तर प्रदेशातील 10, केरळ तथा राजस्थानचे 9-9, तमिळनाडूचे 8, बिहारचे 7, गुजरात-कर्नाटक आणि दिल्लीतील 6-6 पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तर तेलंगणचे 5 पोलिस अधिकारी, असाम-हरियाणा-ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या 4-4, गोव्यातील 1 तसंच इतर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

हा व्हिडिओ पहाः Video | GIRL ASSULTED | सांस्कृतिक कार्यक्रमावेळी मुलीचे बदलले कपडे

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!