VIDEO | भयानक दुर्घटना! दुचाकी-कारची धडक

अपघात सीटीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Goan Varta Live | प्रतिनिधी

मुंबईः ठाण्यातील शहापूर जवळील आग्रा रोडवरील कोर्टासमोर शनिवारी (10 जुलै) सकाळी एक कार आणि दुचाकीची टक्कर झाली. या भीषण अपघातात दुचाकीवरील जोडपं गंभीर जखमी झालं आहे. शहापूर येथील खासगी रुग्णालयात जोडप्याला दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हा भीषण अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचाः …या गावानं रचला विक्रम ! 100 टक्के लसीकरणाची मोहीम फत्ते

कसा झाला अपघात?

मुंबईला लागून असलेल्या ठाणे जिल्ह्यातील शहापूरच्या आग्रा रोडवर एक गाडी आसनगावकडे जात होती. रस्ता अरुंद आणि छोटा आहे. रस्त्याच्या दुतर्फा मोटारी येत आणि जात होत्या. तेवढ्यात समोरून येणारी दुचाकी थेट कारला धडकली. बाईक खूप वेगाने जात होती. बाईकवर एक महिलाही होती. ब्रेक लावून कार चालकाने कारचा वेग नियंत्रित केला. परंतु दुचाकी वेग जास्त असल्याने ती थेट कारला धडकली.

हेही वाचाः हात जोडून एकच विनंती करतो, तुम्ही सुरक्षित राहा- विश्वजीत राणे

दुर्घटनेत बाईक स्वार जखमी

बाईक कारला जाऊन धडकली. दुचाकीस्वार वाईटरित्या खाली कोसळला. दोघांनाही गंभीर दुखापत झाली. रस्त्यावर पडताच दुचाकीस्वार पूर्णपणे बेशुद्ध पडला. हा अपघात होताच जवळपासचे लोक तातडीने त्यांच्याकडे धावले. त्या दोघांनाही पिण्यास पाणी देण्यात आलं. यानंतर त्यांना स्थानिकांच्या मदतीने रुग्णालयात नेण्यात आलं.

हेही वाचाः इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेली पहिली भारतीय संगीतकार बनली नेहा कक्कर

कार चालक सुखरूप, मात्र कारचं नुकसान

कार वेगात नसल्याने कार चालकाला कारवर नियंत्रण राखता आलं. परंतु दुचाकीस्वार खूप वेगात होता. त्यामुळे त्याला वाचविण्यासाठी कार चालक काहीही करू शकला नाही. मात्र, त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात कार चालकाने तातडीने ​​ब्रेक लावला. यामुळे मागून येणाऱ्या ऑटो चालकाने कारच्या मागील बाजूस ऑटोला जोरदार धडक दिली. यामुळे समोरील आणि मागील बाजूस दोन्ही बाजूंनी कारचं नुकसान झालं आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!