नदीपात्रात सेल्फी घेणं महागात, तीन मित्र वाहून गेले

राजस्थानच्या बुंदी जिल्ह्यातील घटना; एकाला वाचवण्यात यश; दोघांचा पत्ताच नाही

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट: सेल्फीचा नाद किती महागात पडू शकतं ते अनेकदा समोर आलं आहे. मात्र, आजचे तरुण अशा घटनांमधून खरंच काही बोध घेताना दिसत नाहीत. राजस्थानच्या बुंदी जिल्ह्यात तीन तरुणांना या निष्काळजीपणाचा फटका बसला आहे. सेल्फी काढण्यासाठी ते नदीपात्रात गेले. यावेळी एका तरुणाचा पाय घसरला. त्याला वाचवण्यासाठी दोघांनी प्रयत्न केले. ते देखील नदीपात्रात पडले. यावेळी पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने ते वाहून गेले. त्यांनी आरडाओरड केला. यावेळी किनाऱ्यावर असणाऱ्या काही गावकऱ्यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. पण गावकरी फक्त एका तरुणाला वाचवू शकले. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने इतर दोन तरुणांचा तपासच लागला नाही.

हेही वाचाः कोरोनाची तिसरी लाट ‘या’ महिन्यांत शिखर गाठेल

नेमकं काय घडलं?

नदी किनाऱ्यावर सोमवारी तीन मित्र गेली होती. दिव्यांशू (वय 21), विकास (वय 17), गुलशन (वय 16) अशी या मित्रांची नावे आहेत. या तीनही मित्रांना नदी किनारी सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. त्यामुळे ते सेल्फी काढण्यात गर्क झाले. यावेळी एका तरुणाता पाय सटकला आणि तो थेट नदीत पडला. यावेळी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करणारे त्याचे इतर दोन्ही मित्रही नदीत पडले. यावेळी ते तीनही मित्र वाहून जात होते. त्यांनी जोरजोरात आरडाओरड केली. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या गावकऱ्यांनी धाव घेतली. गावकऱ्यांना दिव्यांशूला वाचवण्यात यश आलं. पण इतर दोघांचा पत्ता लागला नाही. कारण नदीतील पाण्याचा प्रवाहच तितका जास्त होता.

दोन्ही मुलांचा शोध सुरु

अखेर या घटनेची पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्याला सुरुवात केली. पण दोन्ही मित्रांचा तपास अद्याप लागलेला नाही. पोलीस आणि अग्निशमन पथकाचे जवान त्यांचा नदीत अद्यापही शोध घेत आहेत. तसेत गावकरी देखील त्यांच्या धरतीवर मेहनत घेत आहे. संबंधित घटनेची माहिती मिळताच वाहून गेलेल्या मुलांच्या नातेवाईकांनी घटनास्थळ येऊन आक्रोश केला. यावेळी इतर गावकऱ्यांच्याही डोळ्यांत पाणी आलं. सध्या प्रशासन दोन्ही मित्रांचा शोध घेत आहेत.

हा व्हिडिओ पहाः SAD STORY | VANARMARI | गोव्यातील वानरमारी समाजाची दाहकता

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!