ऐकावं ते नवलंच! केवळ बारावी पास डॉक्टर करत होता कोरोनावर उपचार

सैलाबपुरातील घटना; रोगापेक्षा इलाज भयंकर करणाऱ्या भोंदू डॉक्टरला भेड्या

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट: केवळ निसर्गोपचारचा कोर्स आणि बारावीपास असलेला चंदन चौधरी हा बिहारी एक हॉस्पिटल चालवतो आणि दुर्धर आजार, गर्भपात इ.सह कोरोनावरही उपचार करतो. याशिवाय नर्सिंग कोर्सही चालवतो. गोरगरिबांच्या जीवाशी खेळणाऱ्या या भोंदूला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात.

हेही वाचाः भारताच्या कठीण काळात आम्ही सोबत आहोत

पोलिसांकडून हॉस्पिटलवर छापा

न्यू कामठी पोलिसांनी गुरुवारी सैलाबपुरास्थित हॉस्पिटलवर छापा मारून हॉस्पिटलमधून सेक्स, गर्भपातासह अन्य उपचारांमध्ये वापरात येणाऱ्या औषधी व ऑक्सिजन सिलिंडर आढळून आले. बारावीपर्यंत शिक्षण, वैद्यकीय व्यवसायाची जुजबी माहिती आणि जोडीला नागपुरात केलेला निसर्गोपचारचाकोर्स या बळावर तो गेली दहा वर्षं उपचार करत होता. इंटरनेट व पुस्तकांतून औषधांची माहिती घेऊन रुग्णांना एलोपॅथी औषधं आणि प्रिस्क्रिप्शनही देत असे. सोबतच त्याने हॉस्पिटलमध्ये नर्सिंग अभ्यासक्रमही सुरू केला.

हेही वाचाः ‘फलोत्पादन’कडून स्थानिक भाज्यांच्या दरांत मोठी कपात!

कोरोनाने भोंदू डॉक्टरचं पितळ उघडं पाडलं

चौधरी मुळात बिहार येथील आहे. त्याने बारावीपर्यंत शिक्षण घेतलं आणि तिथेच एका चिकित्सकाकडे तो कंपाऊंडरचं काम करीत होता. कामकाजाचा अनुभव प्राप्त झाल्यावर तो बिहारमध्ये डॉक्टरसारखं काम करू लागला; परंतु तेथे अपेक्षित उत्पन्न होत नसल्याने 12 वर्षांपूर्वी तो नागपूरला आला. विनापदवी उपचार करणं जोखमीचे आहे, हे लक्षात आल्यावर त्याने उदरनिर्वाहासाठी आइस्क्रीम विक्रीचं काम केलं. दरम्यान, त्याने नॅचरोपॅथीचा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि त्यानंतर थेट हॉस्पिटल सुरू केलं. सैलाबपुरा आणि नजीकच्या परिसरात गरीब व मध्यमवर्गीय लोक राहतात. ते चौधरीकडे उपचारासाठी येऊ लागले आणि चौधरीचा व्यवसाय वेग पकडू लागला. गेल्या वर्षी कोरोना संक्रमणामुळे चौधरीचे हॉस्पिटल हाऊसफुल्ल झालं होतं आणि त्याचमुळे त्याचं पितळ उघडं पडलं. तो कोरोना रुग्णांवर प्रोफेशनल चिकित्सकाप्रमाणे उपचार करीत होता. काही दिवसांपूर्वी कोणत्याच हॉस्पिटलमध्ये बेड्स उपलब्ध होत नव्हते. चौधरीने वर्षभरात अनेक कोरोना संक्रमितांवर उपचार केले. ऑक्सिजन, औषधंही दिली, त्या रुग्णांचव काय झालं, याचा पत्ता पोलीस लावत आहेत. काही रुग्णांचा मृत्यू झाल्याचंही पोलिसांना कळलं आहे.

हेही वाचाः कोरोनामुळे मधुमेहींना होऊ शकतो ‘म्युकर मायकोसिस’

गर्भपातासाठी गर्दी

अनैतिक संबंधातून गर्भपात करण्यासाठी प्रेमी युगुल आणि अनैतिक संबंध ठेवणारे लोक या स्वतःला डॉक्टर म्हणवणाऱ्या भोंदूकडे दूरदूरन येत होते. अशा लोकांकडून त्याला वाट्टेल ती किंमतही मिळत होती. सेक्स पावर वाढविण्यासाठीही तो औषधी देत होता.

हेही वाचाः दोन डोसादरम्यानचं अंतर वाढवणार?

जडी-बुटीद्वारे वाढवत होता ‘पॉवर’

चौधरी स्वत:ला एलोपॅथीसह आयुर्वेदचा विशेषज्ञ म्हणवून घेत होता. तो सेक्स पॉवर वाढविणाऱ्या औषधांची पावडर बनवीत होता आणि ते संबंधित जडी-बुटीच्या भुकटीमध्ये मिसळून सेक्स पॉवर वाढविण्यास इच्छुक लोकांना देत होता. अपेक्षित प्रभाव दिसून पडताच लोकांचा चौधरीवर विश्वास वाढत होता. मात्र, सेक्स पॉवर वाढविणाऱ्या औषधांच्या अत्याधिक सेवनाने हृदयघात किंवा अन्य गंभीर आजार होण्याचा धोका असतो, याच्याशी चौधरीला काही घेणं-देणं नव्हतं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!