मंगेशकर, तेंडुलकर शेतकरी विरोधी बनलेत का? ट्विटरवर दोघांवरही तुफान टीका

नव्या कृषी कायद्यांवरुन इंटरनेटवर ट्वीटरवॉर

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

ब्युरो : प्रख्यात गायिका लता मंगेशकर यांनी क्रिकेटर सचिन तेंडुलकर, अभिनेता अक्षय कुमार आणि अजय देवगण यांचे समर्थन केले आहे. त्यांनी शेतकरी आंदोलनात सरकारनं घेतलेल्या भूमिकेचे समर्थन केलं आहे. २००१ मध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित झालेल्या लता मंगेशकर यांचं ट्विट चर्चेचा विषय ठरलंय. तर सचिन तेंडुलकरनेही केलेल्या ट्विटमुळे चर्चांना उधाण आलंय. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयानं केलेल्या कडक टिप्पणीनंतर या दोघांनीही ट्विट केले होते. ज्यामुळे शेतकरी आंदोलनाला समर्थन देणारे त्यांचे चाहते कमालीचे नाराज झाले आहेत. इतकंच नाही तर त्यांनी या दोघांना सुनावण्यासही सुरुवात केली आहे.

९१ वर्षांच्या लता मंगेशकर यांनी ट्विटरवर “# इंडिया टुगेदर” (#IndiaTogether ) आणि “# इंडिया अगेन्स्ट प्रोपेगंडा” (#IndiaAgainstPropaganda) या हॅशटॅगवरुन आपले विचार शेअर केलेत.

काय म्हणाल्यात लता मंगेशकर?

भारत एक गौरवशाली राष्ट्र आहे आणि आम्ही सर्व भारतीयांना देशाचा अभिमान वाटतो. एक स्वाभिमानी भारतीय या नात्याने मला पूर्ण विश्वास आहे की देशाला कोणतीही समस्या किंवा समस्या भेडसावत असताना आपल्या लोकांचे हित लक्षात घेऊन त्याचं निराकरण करण्यास आम्ही पूर्णपणे सक्षम आहोत.

सचिन तेंडुलकरनं ट्विटमध्ये काय म्हटलंय?

भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड केली जाऊ शकत नाही. बाह्यशक्ती प्रेक्षक असू शकतात परंतु सहभागी होऊ शकत नाहीत. भारतीयांना भारत माहीत आहे आणि त्यांनी भारतासाठी निर्णय घ्यावा. चला एक राष्ट्र म्हणून एकजूट राहू या.

सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांनी केलेल्या ट्विट्सवर हजारो प्रतिक्रिया उमटल्यात आहेत. या दोघांचेही चाहते असणाऱ्यांनी या ट्विट्सवर सडकून टीका केली आहे. अर्थात या प्रतिक्रियांमध्ये त्यांचं समर्थन करणारे ट्विट्सही आहेतच. मात्र त्यांची संख्या ही विरोध करणाऱ्या टीका करणाऱ्या ट्विट्सच्या तुलनेत फारच थोडी आहे. सचिन तेंडुलकरने आणि लता मंगेशकर यांनी केलेल्या ट्विटवरुन सध्या तुफान ट्विटरवॉर सुरु आहे. या दोघांही दिग्गजांनी घेतलेल्या भूमिकांवरुन चाहत्यांनी शंका घेत काही सवाल उपस्थित केले आहे. त्यामुळे एकूणच चर्चांना उधाण आलंय.

चाहत्यांनी सुनावलं

अनेकांनी सचिन तेंडुलकरनं घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांच्यावर निशाणा साधलाय. त्यांनं व्यक्त केलेल्या विचारांवरुन तो शेतकरी विरोधी आहे का, अशी शंका घेण्यात आली आहे. काहींनी तर सचिनला राजकारणातलं काहीही कळत नसल्याचं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे. तर दुसरीकडे अनेकांनी तू एक चाहता गमावला असल्याचं म्हटलं आहे. अशाच प्रकारची टीका ही लता मंगेशकर यांच्यावरही करण्यात आली आहे. तुम्ही उत्तम गायक असलात तर या मतामुळे तुम्ही आमच्या मनातून उतरल्याची भावना चाहत्यांनी व्यक्त केली आहे.

प्रिय सचिन, तू क्रिकेटमधला देव आहेस. म्हणून तुला बाकीच्या विषयातलं कळतं, असं कधीच नव्हतं. बाकी आम्ही तर खऱ्या देवालाही…

Posted by Sachin Parab on Wednesday, 3 February 2021

एकीकडे देशभरात नव्या शेती कायद्यांमुळे आंदोलन पेटलंय. तर दुसरीकडे आता दिग्गजांनी व्यक्त केलेल्या भूमिकांमुळे एकूणच चर्चा रंगल्यात. एकीकडे या दोघांवरही टीका होत असताना दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी सचिन तेंडुलकरचं ट्विट रि-ट्विट केलं आहे. या दोघांनीही केलेल्या ट्विट्समुळे तेंडुलकर आणि मंगेशकर शेतकरी विरोधी बनलेत का? या प्रश्नावरुन सोशल मीडियात चर्चांना उधाण आलंय.

हेही वाचा – आमचे सरकार शेतकऱ्यांचे; भाटकारांचे नव्हे!

Video | राजधानीत टोकाचा संघर्ष! झटापटीची भयंकर दृश्य कॅमेऱ्यात कैद

नवा शेतकरी कायदा चांगला की वाईट? | शेतकरी कायद्याचे अभ्यासक अमर हबीब यांच्याशी विशेष संवाद

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!